पुणे

कोऱ्हाळे बुद्रूक येथील कापड दुकानात चोरी

CD

वडगाव निंबाळकर, ता. १४ : कोऱ्हाळे बुद्रूक (ता. बारामती) येथील कापड दुकानातून रविवारी (ता. १२) रात्री सुमारे ६३ हजार रुपयांची कपडे अज्ञाताने चोरून नेली. याबाबत शरद गंगाधर कांबळे (रा. कांबळेवस्ती, कोऱ्हाळे बुद्रूक) यांनी फिर्याद दिली.

बारामती-नीरा रस्त्यालगत असलेल्या कापड दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापत आतमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी कापड दुकानातील कपडे चोरून नेले. दिवसभर दुकानाचे कामकाज पाहिले. रात्री कपडे विक्रीचा हिशोब करत ६ हजार २४० रुपयांची रक्कम पेटीत ठेवून दुकान बंद करून ते घरी गेले. दरम्यान, ता. १३ रोजी सकाळी त्यांना शेजारील दुकानदाराने तुमच्या दुकानातील साहित्य बाहेरील बाजूला अस्ताव्यस्त पडले असल्याचे फोनद्वारे कळविले. कांबळे यांनी येथे येत पाहणी केली असता दुकानाच्या पाठीमागील बाजूला कपड्यांचे रिकामे बॉक्स दिसून आले.
दुकानाची पाहणी केली असता पाठीमागील बाजूचा पत्रा कोणी तरी उचकटून कापून काढत आतील बाजूचे प्लायवूड तोडत दुकानात प्रवेश केला. दुकानात ठेवलेल्या रकमेसह लहान मुलांची विविध मापाची कपडे, मोठ्या मुलींची कपडे, अंडर गारमेंटस तसेच ६४ साड्या चोरीला गेल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT