पुणे

शिंदे यांच्या आठवणींने पिंगोरीकर गहिवरले

CD

वाल्हे, ता.२६ : भारतीय सैनिकांनी प्रतिकूल परिस्थिती असताना पाकिस्तान विरोधातील कारगिल युद्ध जिंकले. यामध्ये पिंगोरी (ता.पुरंदर) येथील हुतात्मा शंकर शिंदे यांनी प्राणांची आहुती दिली. त्या आठवणींना आज (ता.२६) कारगिल विजय दिवसानिमित्ताने पुन्हा एकदा उजाळा मिळाला. त्यांच्या शौर्याच्या आठवणींना कुटुंबीयांसह ग्रामस्थांना देखील गहिवरून आले. यावेळी ग्रामस्थांनी हुतात्मा स्तंभाला अभिवादन केले.

सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथील ग्रामस्थांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी ''भारत मात की जय'', वंदे मातरम, ''अमर जवान तुझे सलाम'', ''जय जवान जय किसान'' आदी घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी येथील हुतात्मा स्तंभाला शहीद शंकर शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे, सेवानिवृत्त कॅप्टन श्‍यामराव शिंदे, सुभेदार अंकुश शिंदे, बाबासाहेब यादव, महादेव गायकवाड, राजेंद्र शिंदे, हवालदार सदाशिव शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हुतात्मा शंकर शिंदे हे कारगीलमध्ये तर रमेश शिंदे श्रीलंकेत शांती सेनेत असताना शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ गावामध्ये शहीद स्मारक उभारले आहे. दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिन साजरा करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात येत असल्याचे पिंगोरी सरपंच संदीप यादव यांनी सांगितले.
माजी सैनिक राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले.

01819

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT