पुणे

वाल्हे येथील आगीत ६१ लाखांचे नुकसान

CD

वाल्हे, ता. ३ : येथील बाजारपेठेतील राजगोपाल काबरा व राजगोपाल काबरा यांचे घर व किराणा दुकानाला गुरुवारी (ता. २) रात्री लागलेल्या आगीत जवळपास ६१ लाख पन्नास हजार रूपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या आगीची माहिती मिळताच जेजुरी व वाल्हे पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन जेजुरी नगरपालिका व नीरा येथील ज्युबिलियंट कंपनीच्या अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास चार तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आग आटोक्यात
आली. मात्र, गावातील अरुंद रस्ते, त्यावर पार्किंग केलेली वाहने आणि अतिक्रमणांमुळे अग्निशमन यंत्रणेला बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
दरम्यान, रात्री जेजुरीचे पोलिस निरीक्षक बाबूसाहेब सांडभोर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, माजी सभापती गिरीश पवार, सरपंच अतुल गायकवाड, माजी सरपंच अमोल खवले आदींनी, तर शुक्रवारी आमदार संजय जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंडल अधिकारी भारत भिसे, तलाठी संजय उमाप, कोतवाल आनंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT