पुणे

पर्यावरण संवर्धनासाठी सायकल वारी

CD

वाल्हे, ता. ७ : तरुण पिढीला आरोग्याच्या सुदृढतेचे आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी धायरी (पुणे) येथील सिंहगड वॉरिअर्स ग्रुपच्या वतीने शनिवारी (ता. ६) पुणे ते पंढरपूर सायकल वारीसाठी प्रस्थान केले.
सदृढतेचे आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून सिंहगड वॉरिअर्स ग्रुपच्या वतीने दरवर्षी विविध ठिकाणी सायकल वारीचे आयोजन केले जात आहे. यंदा चौथ्या वर्षी आषाढी वारीनिमित्त पुणे-पंढरपूर सायकल वारीमध्ये जेष्ठांसह तीस सायकलपटू सुमारे दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास
एक दिवसात पार करणार आहेत.
या सायकल वारीचे पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे शनिवारी (ता. ६) रात्री सात वाजता आगमन होताच त्यांचा सरपंच अतुल गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वाल्हे जिल्हा बँकेचे शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे, दादासाहेब भुजबळ, रामदास सपकाळ, परेश खोचे, नीलेश दुर्गाडे, प्रकाश चव्हाण, प्रवीण भुजबळ, विनय दुर्गाडे, भूषण भुजबळ, क्षितीज भुजबळ, राजेंद्र रोकडे, संभाजी मोरे आदि उपस्थित होते. यावेळी सायकलपटूंना राहुल भुजबळ, मनोज भुजबळ यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली आली होती. याउपक्रमाबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी सायकलपटूंशी फोनवर बोलून अभिनंदन केले. राहुल भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले.

विविध ठिकाणी सायकल वारीचे आयोजन केले जात आहे. त्यामाध्यमातून तरुणांचा सहभाग वाढत आहे. सायकलवारीमधून पर्यावरण संतुलनाबाबत तसेच शारीरिक समृद्धीचा प्रचार, प्रसार करीत आहे. मंगेश भुजबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT