सामूहिक आत्महत्या करण्याचा
बानगेतील धरणग्रस्तांचा इशारा
म्हाकवे, ता. ७ : बानगे (ता. कागल) येथील काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीत ९२ गुंठे जमीन ही धरणग्रस्तांसाच्या सार्वजनिक विकासासाठी राखीव ठेवली आहे. या जमिनीतील ४० गुंठे जमीन नागनवाडी प्रकल्पग्रस्त श्रीमती सुनंदा मारुती इंदुलकर यांना दिली आहे. वसाहतीमधील जमिनीच्या वाटपाचा आदेश अन्यायकारक आहे. हा आदेश रद्द न झाल्यास १८ एप्रिलला कुटुंबासह मोर्चाने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करत असल्याचे लेखी निवेदन बानगे (ता. कागल) येथील धरणग्रस्तांनी दिले आहे. निवेदनावर मारुती कांबळे, विठ्ठल पाटील, आनंदा कांबळे, तानाजी कांबळे यांच्यासह धरणग्रस्तांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, विभागीय अधिकारी राधानगरी कागल, जिल्हा पोलिसप्रमुख, शाहूपुरी पोलिस ठाणे यांना दिल्या आहेत.
दरम्यान, नागणवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये आमची जमीन गेली आहे. गेली २२ वर्ष आम्ही आमच्या पसंतीनुसार जमीन मिळावी म्हणून शासनाकडे मागणी करत आहोत; मात्र आम्हाला एकाच ठिकाणी ४० गुंठे जमीन पसंत पडली नाही. बानगे (ता. कागल) येथे रस्त्यालगत असलेली ही चाळीस गुंठे जमीन पसंत पडल्याने शासनाकडे मागणी केली. त्यामुळे शासनाने आम्हाला जमिन दिली असल्याने कोणा शेतकऱ्यांकडून आम्ही जमीन काढून घेतलेली नाही. बावीस वर्षांनंतर आम्हाला जमीन मिळाल्याने समाधानी आहोत, असे नागणवाडी प्रकल्पग्रस्त सुनंदा इंदुलकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.