मुंबई, ता. १५ : रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापकांकडून गौरव करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान केला.
सीएसएमटी येथे सोमवारी, (ता. १४) आयोजित कार्यक्रमात प्रसंगावधान दाखवून योग्य कामगिरी करणाऱ्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रोख २ हजार रुपये देण्यात आले. मुंबई विभागातील हेड कॉन्स्टेबल प्रमोद डेणे आणि वाडी बंदर येथील समय सिंग मीना यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रमोद डेणे यांना मध्यरात्री एस्कॉर्ट ड्युटी करत असताना जळण्याचा वास आला. इंजिनच्या शेजारी असलेल्या कोचच्या चाकातून धूर निघत असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी ताबडतोब अलार्म चेन ओढून रेल्वे थांबवली आणि आग विझवण्यात मदत केली.
समय सिंग मीना यांनी पंजाब मेलच्या अंडरगिअरची तपासणी करताना सेकंडरी सस्पेंशनच्या वरच्या आणि खालच्या कॉइल तुटलेल्या आहेत. ते पाहिल्यानंतर कोच उपयोगास अयोग्य असल्याचे त्वरित चिन्हांकित केले होते.
यासह भुसावळ विभागातील गार्ड प्रफुल्ल कुमार, लोको पायलट मेल डी. डी. कोल्हे, नागपूर विभागातील शिवपाल कन्हैया, चावीवाला सुधीर नानाजी, कोल्हापूर येथील मुकेश कुमार, सुजित कुमार, सोलापूरमधील भाळवणी येथील पेट्रोलमन दिनकर सूळ, सोलापूर येथील सेंद्री पाईंटमन महेश सदाशिव यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
सुरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रेरणा देईल.
- अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.