कामशेत, ता. ५ : उन्हाच्या झळांनी मावळातील वातावरण जितके तापले. तितकेच मावळच राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल अजून वाजले नसले तरी गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीला कमालीचे महत्त्व आले असून, पॅनल विरुद्ध पॅनल लढवून निवडणुका होऊ लागल्या आहे.
याही निवडणुकीचा प्रचार हायटेक होत असून, मतदारांना प्रलोभने आमिषे दाखवून मतदान खेचून आणण्यासाठी पॅनलप्रमुखांनी चंग बांधला आहे. मागील महिन्यात सुरू झालेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत स्टेटमेंट शब्द लोकप्रिय होऊ लागला आहे. आंबळे विविध कार्यकारी सेवा संस्था, आंबळे, पीरसाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मंगरूळ या निवडणुका बिनविरोध झाल्या असल्या तरी वाऊंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सांगिसे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणूका पॅनल टू पॅनल लढवल्या गेल्या. हे झाले गाव पातळीवर लढवत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे. कुठे ना कुठे पॅनल अंतर्गत ठरल्या प्रमाणे उपसरपंचपदाच्या निवडी होत आहे. उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया ही सहज साधी असली तरी पूर्वी उपसरपंचपदावर विराजमान असलेल्या सदस्याचा राजीनामा करून घेण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतोय. यासाठी होणारी पळापळ आणि धावाधावानी गावपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे.
ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका, सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी, विविध कार्यकारी सेवा संस्थेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा गुलाल खाली पडतो ना पडतो तोच पक्ष संघटनेतील निवड नियुक्तीचे फ्लेक्स, बॅनर गल्ली बोळात झळकू लागलेले पाहायला मिळतात. हे झाले सगळे गावोगावी होणाऱ्या राजकीय घडामोडी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागल्या इच्छुकांच्या इव्हेंटने राजकीय वातावरण अधिक डिवचले जाऊ लागले आहे. त्याला सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडिओ, ऑडिओने जोड दिल्याने कित्येक वेळ मोबाईलमध्ये कार्यकर्ते अडकून पडू लागले आहे.
सोशल मीडियावर आलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडू लागला की, यातील चुरस अधिक वाढून उत्तराला प्रत्युत्तर दिले जात आहे. मागल विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केलेले बाळासाहेब नेवाळे यांच्या भोवती दोन दिवसांपासून राजकीय वातावरण फिरत आहे. नेवाळे यांनी भाजपात प्रवेश केलेल्यानंतर तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथ झाल्या. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रेय शेवाळे यांच्या सदस्य पदाला आवाहन देण्यात आले. नेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादीशी काडीमोड घेतलेल्या नेवाळेंना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलमध्ये उमेदवारी दिल्याने तालुक्यातील वातावरण अधिक तापले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.