पुणे : कोरोनामुळे (Corona)सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांवर बंधने आल्याने शालेय, महाविद्यालयीन खेळाडूंना तसेच खुल्या गटातील खेळाडूंना (Players)त्यांचे कौशल्य (Skill)दाखविण्याची संधी मिळाली नाही. गेल्या दीड वर्षात मोजक्या स्पर्धा झाल्या आहेत. आता पुणे महापालिकेने या खेळाडूंना दोन ऐवजी एका वर्षाच्या कामगिरीवरच महापालिकेची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. त्यामुळे खेळाडूंना दिलासा मिळणार आहे.(Players will receive a one year performance scholarship)
पुणे महापालिकेने शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी २०१८ मध्ये क्रीडा धोरण तयार केले आहे. खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी दरवर्षी महापौर चषक देखील आयोजित केला जातो. जिल्हा स्तरीय, विभागीय स्तरीय, राज्य स्तर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते. तर खेळाडूंना दैनंदिन सराव, क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षणासाठी शासनाच्या धोरणानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडील मान्यताप्राप्त शासकीय व खासगी क्रीडा संस्थांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदानही दिले जाते. या संस्थांकडून खेळाडूंना मोफत साहित्य उपलब्ध होते.
महापालिकेच्या धोरणानुसार क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दोन वर्षाची कामगिरी कशी आहे, हे तपासून शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला जातो. यंदाच्या वर्षी शिष्यवृत्ती देण्यासाठी २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षातील खेळाडूंची कामगिरी तपासली जाणार आहे. पण, कोरोनामुळे मार्च २०२० पासून जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. पण, या काळात खेळाडूंनाच सराव सुरू होता. महापालिकेच्या दोन वर्षाच्या निकषामुळे खेळाडूंवर अन्याय होणार असल्याने अट शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यंदाच्या वर्षी खेळाडूंना शिष्यवृत्तीसाठी २०१९-२० या एका वर्षातील कामगिरी ग्राह्य धरली जाणार आहे. क्रीडा धोरणातील हा बदल करण्यासाठी प्रशासनाने क्रीडा समितीसमोर प्रस्ताव ठेवला आहे.
‘‘२०२० या वर्षात क्रीडा स्पर्धा न झाल्याने दोन ऐवजी एकाच वर्षातील खेळाडूंची कामगिरी शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा समितीच्या मान्यतेनंतर याचा अंतिम निर्णय होईल.’’
- संतोष वारुळे
स्तर शिष्यवृती रक्कम
शालेय व विद्यापीठ गट - खुला गट
शहर/जिल्हा - १०००० - २००००
विभाग - १५००० - २५०००
राज्य - २०००० - ३००००
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय -३०००० - ५००००
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.