कोरोना संसर्गाबाबत मुलींना सर्वेक्षण करून देण्यास विरोध केल्याच्या गैरसमजातून माजी नगरसेवक व त्याच्या साथीदारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केली.
पुणे - कोरोना संसर्गाबाबत (Coronavirus) सर्वेक्षणासाठी (Survey) आलेल्या मुलींना सर्वेक्षण करून देण्यास विरोध (Oppose) केल्याच्या गैरसमजातून माजी नगरसेवक (Ex-corporator) व त्याच्या साथीदारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्के, रबरी पाइप आणि प्लास्टिकच्या जारने बेदम मारहाण (Beating) केली.
मेलरॉय मार्टिन डिसूझा (वय ६०, रा. गंगा व्हिलेज सोसायटी, महंमदवाडी, हडपसर) असे मारहाणीत जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माजी नगरसेवक फारुक इनामदार, त्यांचा मुलगा सुफीयान इनामदार, शहरु, साहिल, आयफास व इतर अनोळखी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फिर्यादी राहत असलेल्या वानवडीतील गंगा व्हिलेज सोसायटीसमोर शनिवारी (ता. २९) दुपारी दोन वाजता घडली.
माजी नगरसेवक फारुक इनामदार यांनी कोव्हिड -१९ च्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यास चिंतामणीनगर गल्ली क्रमांक सात येथील सर्वेक्षणाकरिता आलेल्या मुलींना फिर्यादी यांनी विरोध केल्याचा फारुक इनामदार यांचा गैरसमज झाला. त्यामुळे फिर्यादी हे चर्चमधून घरी जात असताना फारुक इनामदार, त्यांचा मुलगा व इतरांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी, रबरी पाइप व प्लास्टिकच्या जारने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांचा चष्मा व घड्याळाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.