गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी सध्या निर्माण झाल्याने तसेच मनोरंजनासाठी गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
पुणे - गेमिंगच्या (Gaming) माध्यमातून पैसे कमावण्यासाठी सध्या निर्माण झाल्याने तसेच मनोरंजनासाठी (Entertainment) गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गेमिंगच्या या चढाओढीत मोबाईल गेमर्सच्या (Mobile Gamers) आकडेवारींमध्ये पुण्याने (Pune) मुंबईला मागे टाकले आहे. त्यामुळे मोबाईल गेम खेळणाऱ्यांच्या संख्येत पुणे देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.
ई-स्पोर्ट स्किल गेमिंग व्यासपीठ असलेल्या मोबाईल प्रिमिअर लीगने (एमपीएल) सादर केलेल्या इंडिया मोबाईल गेमिंग रिपोर्ट २०२१ (आयएमजीआर) नुसार पुणे शहराने गेल्या वर्षी मोबाईल गेमर्सच्या आकडेवारींमध्ये जवळपास १७ टक्के वाढीसह मुंबईला मागे टाकले आहे. २०२१ मध्ये मुंबईच्या तुलनेत पुण्यामध्ये गेमर्सची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. पुणे, लखनौ व पटणा आदी शहरांनी मुंबई, बेंगळुरू व कोलकत्ता यांसारख्या मोठ्या शहरांना मागे टाकले आहे. पटणानंतर मुंबई व बेंगळुरू अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानावर होते तर कोलकता १२व्या स्थानावर होते.
मोबाईल गेमर्सच्या आकडेवारीच्या संदर्भात दिल्ली, जयपूर, पुणे, लखनौ व पटणा ही देशातील अव्वल पाच शहरे बनली आहेत. आयएमजीआर २०२१ च्या मते कॅरम, फ्रूट डार्ट, फ्रूट चॉप, क्रिकेट क्लॅश, रनर नं. १ हे काही टॉप गेम्स राजस्थानमधील गेमर्समध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले. तर राष्ट्रीय स्तरावर चेस व पूल यांसारख्या मोबाईल या गेमर्सच्या आकडेवारींमध्ये लक्षणीय वाढ झाली. २०२१ मध्ये एमपीएल व्यासपीठावर १.३ दशलक्ष ईस्पोर्ट खेळाडूंची नोंद झाली. जवळपास अर्ध दशलक्ष गेम्स व्यासपीठावर खेळले गेले, तर १७ दशलक्ष लाइव्ह दर्शकांची नोंद झाली आहे.
यामुळे वाढली गेमर्सची संख्या
किफायतशीर स्मार्टफोन्सच्या उपलब्धतेसह हाय-स्पीड इंटरनेटने लहान मोठ्या शहरातील अनेक नागरिकांना गेमिंगचा आनंद घेण्यास प्रवृत्त केले आहे. गेमिंगसाठी मोबाईल-आधारित व्यासपीठांनी अनेकांना कौशल्य-आधारित गेम्स व स्पर्धा सुलभपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा देखील परिमाण गेमर्सची संख्या वाढण्यावर झाला आहे.
ईवायने व्यक्त केलेले अंदाज :
- ऑनलाइन गेमिंगसाठी देशातील बाजारपेठ २०१९ साली ९०६ दशलक्ष डॉलर्स
- २०२३ मध्ये ही बाजारपेठ दोन बिलियन डॉलर्स होणार
- देशातील ऑनलाइन गेमर्सची संख्या २०२० मध्ये ३६० दशलक्ष होती
- २०२२ साली ती ५१० दशलक्षपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
- यापैकी सुमारे ८५ टक्के मोबाईल गेमर्स आहेत
(ईवाय ही एक सल्लागार संस्था आहे)
मोबाईल गेमर्सची टॉप पाच शहरे
- दिल्ली
- जयपूर
- पुणे
- लखनौ
- पटणा
सर्वाधिक पसंती मिळालेल्या गेम्स :
चेस व पूल रिपोर्टमधील महत्त्वाचे मुद्दे :
- गेल्या वर्षी एमपीएल व्यासपीठावर १.३ दशलक्ष ईस्पोर्ट खेळाडूंची नोंद
- जवळपास अर्ध दशलक्ष गेम्स व्यासपीठावर खेळले गेले
- १७ दशलक्ष लाइव्ह दर्शकांची नोंद झाली आहे.
ऑनलार्इन गेम खेळताना मला गेल्या वर्षी १५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले होते. तेव्हापासून माझा गेमिंगमधील रस वाढला आहे. मी रोजचे सुमारे दोन तास मोबार्इलवर गेम खेळतो. गेम खेळताना मिळणारा आनंद, विजेत्यांना मिळणार असलेले बक्षीस यामुळे गेमर्सची संख्या वाढत आहे.
- राजेश, ऑनलाइन गेम खेळणार तरुण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.