Recovery agent sakal
पुणे

पुणे : वसुली एजंटांची गुंडगिरी!

फायनान्स कंपन्यांकडून झटपट कर्ज उपलब्ध होत

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्जावर घेतलेल्या रिक्षावर कुटुंब चालेल, मुलांचे शिक्षण पूर्ण करू आणि दोन पैसे साठवून ठेवू, असे स्वप्न विजयने पाहिले. त्याने फायनान्स कंपन्यांकडून झटपट कर्ज उपलब्ध होत असल्याने त्यांच्या कर्जाच्या साह्याने रिक्षाही घेतली. पण कोरोनाचा त्याला फटका बसला. २-३ हप्ते थकले आणि त्यानंतर काही दिवस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यापासून ते थेट जीवे मारण्याचा प्रयत्न वसुली एजंटांकडून होत आहे. फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांच्या गुंडगिरीमुळे कर्जदार अक्षरशः त्रस्त झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या लाटांमध्ये अनेक नागरिकांच्या नोकरी, व्यवसायावर गदा आली. जगण्याचे साधन हातातून गेल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांकडून पुन्हा एकदा नवी उभारी घेण्यासाठी रिक्षा, टेंपो, कार अशा विविध प्रकारची वाहने फायनान्स कंपन्यांच्या झटपट मिळणाऱ्या कर्जाच्या साहाय्याने वाहने घेत वेगळ्या व्यवसायाला सुरुवात केली.(Recovery agents bullying)

परंतु, कोरोनाचा चढ-उताराचा फटका पुन्हा एकदा या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसू लागला आहे. एकीकडे उत्पन्न मिळण्याचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाले आहे, त्यामुळे अनेकदा फायनान्स कंपन्यांचे एक-दोन हफ्ते थकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तर दुसरीकडे एक हफ्ता थकला तरीही फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजन्सीचे कर्मचारी कर्ज घेणाऱ्यांशी अक्षरशः सराईत गुंडांसारखे वागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

वाद घेऊन आमच्याकडे का?
संबंधित फायनान्स कंपन्या, त्यांच्या वसुली एजन्सीच्या व्यक्तींकडून फोनद्वारे कर्ज घेणाऱ्यांना उद्धटपणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच एजन्सीच्या ४-५ व्यक्ती संबंधित नागरिकास रस्त्यात अडवून हप्ते भरण्यासाठी दमदाटी, मारहाण करण्यापासून ते जीवघेणे हल्ले करण्यापर्यंतचे प्रकार करीत आहेत. यासंदर्भात नागरिक पोलिस ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलिसांकडून त्यांनाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. त्यांची तक्रार घेण्याचीही तसदी पोलिस घेत नाहीत. याउलट ‘कर्ज तुम्ही घ्यायचे, हफ्ता तुम्ही थकवायचा आणि वाद घेऊन आमच्याकडे कसे येतात’ अशा शब्दात त्यांची बोळवण केली जात असल्याचे वास्तव आहे.(Pune news)

वाहनांची परस्पर विक्री
रिक्षा, टेंपो किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे कर्ज थकल्यानंतर त्यांना कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता थेट वाहने उचलून नेतात. रिक्षावर प्रवासी बॅज असते, त्या संबंधित रिक्षाचालकाच्या संमतीशिवाय कोणालाही विकता येत नाहीत. तरीही कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करून वाहनांची परस्पर विक्री केली जाते. एवढेच नव्हे, तर वाहने उचलून आणल्यानंतर टोईंगचे ३ हजार ८५० रुपये, त्यावर जीएसटी, वाहन पार्किंग करण्याचे प्रत्येक दिवसाचे ८० रुपये अशा प्रकारे रिक्षा चालकांची अक्षरशः लूट केली जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

परराज्यातून होते कारवाई
वाहन कर्ज थकविणाऱ्यांना दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थान, कर्नाटक अशा राज्यांमधून फोन येतात. संबंधित व्यक्तींकडून नागरीकांना दमदाटी, भीती दाखवून नोटीस बजावली जाते. तसेच त्यांना अन्य राज्यांमधील न्यायालयात हजर राहण्यास भाग पाडले जाते. त्यांना प्रतिसाद न दिल्यास थेट कारवाईची भाषा दाखविली जात असल्याने वाहन कर्ज घेणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.(Pune crime News)

  • असे आहेत ‘आरबीआय’चे नियम
    - वाहन कर्ज घेणाऱ्यांशी कायदेशीर मार्गाने संपर्क साधावा
    - करारनामा पत्रे स्थानिक भाषेत असावेत
    - वाहन कर्ज घेणाऱ्यांना जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही
    - वाहन कर्ज घेणाऱ्यांच्या घरी, कार्यालयात जाऊन बदनामी करू नये

फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांकडून कर्ज घेणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. त्यावर मागील काही दिवसांपासून आम्ही काम करीत आहोत. तरीही अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल. वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांना याबाबत सूचना देण्यात येतील.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

सावकार परवडला, पण फायनान्सवाले नको, असे म्हणण्याची वेळ सध्या रिक्षा चालकांवर आली आहे. फायनान्स कंपन्या आरबीआयच्या आदेशाचे उल्लंघन करून कर्जावर वाहने खरेदी करणाऱ्यांचे अक्षरशः जगणे मुश्कील केले आहे. एक हफ्ता थकला तरीही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहेत. पोलिसही रिक्षा, टेंपो व कर्जावर घेतलेल्या अन्य वाहनचालकांनाच त्रास देत आहे. हा प्रकार थांबला नाही, तर कंपन्यांविरुद्ध रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत

बजाज फायनान्स कंपनीकडून कर्जावर रिक्षा घेतली. चार हप्ते थकल्यानंतर फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटनी मला रस्त्यात अडवून जबर मारहाण केली. त्यामध्ये माझ्या बरगड्यांना जबर मार बसला होता. उपचार घेतल्यानंतरही हप्त्यांसाठी फोन येत असून संबंधित व्यक्ती शिवीगाळ करतात.
- किशोर पवार, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT