पुणे

खरे सौंदर्य बुद्धिमत्तेचे अविनाश धर्माधिकारी यांचे मत; एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा

CD

पुणे, ता. १६ ः ‘‘खरे सौंदर्य हे बुद्धीमत्तेत आहे. त्यामुळे बुद्धीच्या सौंदर्यांनी सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून प्रेम करा. प्रेम ही एक शाश्‍वत शक्ती असून संतांनीही त्याची व्याख्या केली आहे. या जीवनात सर्वांवरच प्रेमाचा वर्षाव व्हावा,’’ असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्याने आयोजित केलेल्या ब्रिलियंटाईन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे आणि सह्याद्री वाहिनीचे माजी संचालक मुकेश शर्मा उपस्थित होते.
भारतीय संस्कृती, परंपरा, पौराणिक कथा, अध्यात्म, धर्म, योग व इतिहास आदी विषयांवर निबंध स्पर्धा, प्रश्‍नमंजूषा आणि वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या मध्ये २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘ब्रिलियंटाईन’ स्पर्धेत परम लखानी (स्कूल ऑफ मीडिया अ‍ॅण्ड जर्नालिझम) यांना एमआयटी डब्ल्यूपीयू पीस किंग व सायली डोईफोडे (स्कूल ऑफ मॅथेमॅटिक अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिक्स) यांना एमआयटी डब्ल्यूपीयू पीस ऑफ क्वीनचा मुकुट घालून विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या स्पर्धेतील पुरुष उपविजेते वेदांत काळे (स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग), प्रणय करकाळे (स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग) आणि महिला उपविजेता सिद्धी देशमुख (स्कूल ऑफ मॅनेजमेंट यूजी, टीवाय बीबीए) व वैष्णवी बावठनकर (फॅकल्टी ऑफ लिबरल आर्ट) यांचाही सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT