पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएमपीएमएलच्या १४० ई-बसचे आणि बाणेर ई-बस डेपोचे रविवारी लोकार्पण करण्यात आले.
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पीएमपीएमएलच्या (PMPML) १४० ई-बसचे (e-bus) आणि बाणेर ई-बस डेपोचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. पुणे (Pune) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून (Pimpri Chinchwad Municipal Corporation) ३५० व केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत १५० अशा एकूण ५०० ई-बस ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ई-पॉलिसी धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. बाणेर येथील ई-डेपो जागतिक दर्जाचा उभारण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यानंतर सोमवारपासून पाच मार्गावर ३० ई-बससेवा सुरु करण्यात आली. पुढच्या टप्प्यात १४ मार्गावर ७० बस सुरु केल्या जाणार आहेत. तसेच प्रतिदिन प्रति बस २०० किमी प्रमाणे बस संचलनाचे नियोजन आहे. या ३५० बससाठी बाणेर, वाघोली, मोशी, चऱ्होली व निगडी हे पाच डेपो विकसित केले जाणार आहेत. तसेच प्रति दिन प्रति बस २०० कि.मी. प्रमाणे बस संचलनाचे नियोजन आहे. डेपोवर एका वेळी ३५ बस चार्जिंग करता येणार आहेत. त्यासाठी ३५ एसी/डीसी चार्जर बसविलेले आहेत. पूर्ण चार्जिंग होण्यासाठी सुमारे चार ते साडे चार तासांचा वेळ लागतो. प्रतिकिमी ७ ते ८ रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे डिझेलच्या तुलनेत ई-बसचा खर्च कमी आहे.
योजना दृष्टिक्षेपात
- प्रवाशांची वाढती मागणी आणि राज्य सरकारच्या ई-पॉलिसी धोरणानुसार ई-बस सुविधा
- पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ३५० ई-बसेससाठी प्रतिबस ५० लाख रुपये प्रमाणे अनुदान दिले
- पीएमपीएमएलला केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत १५० ई-बसेससाठी प्रतिबस ५५ लाख रुपयेप्रमाणे सबसिडी मंजूर
- महामंडळाकडे अत्याधुनिक १२ मीटर बीआरटी ५०० ई-बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार
- आजरोजी ३५० ई-बसेसपैकी १४३ ई-बसेसची आरटीओ नोंदणी पूर्ण
केंद्र सरकार व दोन्ही महानगरपालिका यांनी पीएमआरडीए परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ई-बसना प्राधान्य दिले आहे. ई-बसला प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगला आहे. तसेच इतर बसप्रमाणेच तिकिटाचे दर आहेत. आरामदायी प्रवास आहे. टप्प्याटप्प्याने डिझेल बसची संख्या कमी होणार आहे. ई-बसमध्ये वायफाय सुविधाही दिली जाणार आहे. अडीच एकर जागत बाणेर डेपो सर्व सुविधांसह उभारण्यात आला आहे.
- डॉ. चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.