पुणे, ता. २४ ः राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आता सरकारी योजनांच्या प्रसार व प्रचारासाठी लोककलांचा आधार घेण्यास सुरवात केली आहे. यानुसार पुणे विभागातील गावागावांत कला पथकांच्या माध्यमातून सतत आठवडाभर सरकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रचार-प्रसिध्दी ही कला पथकांच्या माध्यमातून करण्यात आली. पुणे विभागातील तीन जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांमधील मिळून १८९ गावांत ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत कला पथकांनी शाहिरी, पथनाट्य, पोवाडे, भारुडे यांच्या माध्यमातून योजनांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवली. यात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील प्रसन्न प्रॉडक्शन, कलाछंद व जय मल्हार कलामंच या तीन कला पथकांच्या, सातारा जिल्ह्यात त्रिरत्न सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, आधार सामाजिक विकास संस्था व लोकरंगमंच, तर सोलापूर जिल्ह्यात जय भवानी कला पथक सांस्कृतिक मंडळ, भैरव मार्तंड जागरण गोंधळ व सांस्कृतिक कलामंच आणि महात्मा फुले ग्रामीण विकास संस्था यांच्यामार्फत ही जनजागृती करण्यात आली. या पथकांच्या माध्यमातून राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत राबविलेली सरकारी धोरणे, घेतलेले निर्णय, कार्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.