मागील तीन वर्षांपासून आम्ही कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक आहोत. त्यामुळे यावर्षी लोकसभा निवडणुकीला आम्हाला आमचा मतदानाचा हक्क बजावता आला नाही. आज होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही खास ठरवून अमेरिकेतून आलो आहोत. दर पाच वर्षांनी येणारा हा लोकशाहीचा सोहळा अनुभवण्याची मजा आणि जबाबदारी वेगळीच असते. सर्वांनी आणि विशेषतः तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून सशक्त लोकशाही बनवण्यात हातभार लावावा, हीच इच्छा.
- गीता गोखले, चंद्रशेखर गोखले
---------------
मतदान हा भारतातील लोकशाहीचा पाया आहे. भारतात प्रत्येक नागरिकाला त्यात सहभागी होण्याचा अधिकार आणि जबाबदारी आहे. मतदान करून आपण आपल्या देशाचे भविष्य घडवण्यात सक्रिय योगदान देऊ शकतो आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडू शकतो. प्रत्येक वेळी मी परदेशातून येऊन मतदानाचा हक्क बजावतो.
- चेतन शेंडे
-----------
मतदान हा केवळ अधिकारच नाही, तर एक नागरी कर्तव्य देखील आहे. त्याचा वापर करून व्यक्ती लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावतात. मतदानामुळे लोकशाही व्यवस्थेची वैधता आणि विश्वासार्हता मजबूत होते. मी नेहमी परदेशातून भारतात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येते.
- पूजा शेंडे
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.