पुणे

भावे गौरव पदकाचे उद्या सांगलीत वितरण

CD

सांगली, ता. ३ ः मराठा आरक्षण आंदोलनामुळे स्थगित करण्यात आलेला विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान समारंभ रविवारी (ता. ५) होणार आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन स्थगित केल्याने समारंभ नियोजित ठिकाणी व ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली.
डॉ. कराळे म्हणाले, ‘‘मराठी रंगभूमी दिनानिमित्त रविवारी (ता. ५) सांगलीत सायंकाळी सहा वाजता चित्रपट व नाट्य अभिनेते डॉ. प्रशांत दामले यांना भावे गौरव पदक प्रदान केले जाईल. सांगलीचे भूतपूर्व संस्थानिक विजयसिंहराजे पटवर्धन व राजलक्ष्मी पटवर्धन यांच्या हस्ते पदक वितरण समारंभ होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता नटराज पूजन झाल्यानंतर शहरातील हौशी कलाकार नाट्यसंगीत सादर करतील.’’
-----------------------
ते म्हणाले, नाट्यपंढरीत मराठी रंगभूमी दिनानिमित्त आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाने गौरव पदक दिले जाते. नाट्य, चित्रपट, संगीत सृष्टीत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या एका कलाकाराला दरवर्षी पदक देऊन गौरवले जाते. यंदाचे पदक नाट्यपरिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत दामले यांना घोषित झाले आहे.
रंगभूमीदिनीच सांगलीत १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार होती. मात्र मराठा आरक्षण आंदोलनामुळे तो समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. मात्र गुरुवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आल्याने राज्यभर सुरू असणारे आंदोलनही थांबले. त्यामुळे दरवर्षी मराठी रंगभूमीदिनी होणारा विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान कार्यक्रम घेण्याचा मार्ग मोकळा झाला.
समितीचे कार्यवाह विलास गुप्ते, कोषाध्यक्ष मेधा केळकर, जगदीश कराळे, बलदेव गवळी, विवेक देशपांडे उपस्थित होते.
...............................................................
चौकट
नाट्यसंमेलन मुहूर्तमेढीचा निर्णय दिवाळीनंतरच
नाट्यपंढरीत सांगलीत १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्याचा समारंभही रंगभूमी दिनादिवशी होणार होता. मराठा आंदोलनामुळे तो लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्थानिक संयोजन समितीने घेतला. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले भावे गौरव पदक स्वीकारण्यासाठी रविवारी सांगलीत येत आहेत. त्यांच्याशी या समारंभाबाबत चर्चा केली जाईल. मुंबईत होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असे नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य चंद्रकांत धामणीकर यांनी सांगितले.
................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT