हार्मोनिका या वाद्याला बरेचजण माउथ अॉर्गन या नावाने ओळखतात. छोट्याशा दिसणाऱ्या या वाद्यातून स्वरांचं मोठं इंद्रजाल निर्माण करण्याची किमया काहींना साध्य झालेली असते. अशांपैकीच एक आहेत पुण्यातील स्वाती जोशी.
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या स्वातीताईंना हार्मोनिका वादनाचा छंद जडला आणि जणू त्यांना अखंड
आनंदाचा झराच सापडला. त्या म्हणाल्या, ‘‘महाविद्यालयीन काळात केव्हा तरी प्रवासातला वेळ कंटाळवाणा होऊ नये म्हणून मी हार्मोनिका वादन आजमावलं. त्यानंतर मला त्याची आवडच निर्माण झाली. कुणाकडूनही न शिकता
प्रयत्नपूर्वक यावर गाणी बसवू लागले. वाजवणं छान जमल्यावर मित्र परिवारात, नातेवाइकांच्या सहवासात त्यांच्या आग्रहाखातर हार्मोनिका वादनाची छोटेखानी मैफल करायचे. पण, शिक्षण आणि त्यानंतर लग्न झाल्यावर यात खंड पडला."
स्वातीताईंनी असंही सांगितलं की, ‘‘काही काळानंतर नवऱ्याने हार्मोनिका भेट दिलं. तेव्हा पुन्हा वाजवू लागले. यातील प्रशिक्षणही घेतलं. गेली सात-आठ वर्षं एकल व समूह वादन करते. १९५० ते ७० हा हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ मानला जातो. संगीतकार शंकर-जयकिशन, सचिनदेव बर्मन, ओ. पी. नय्यर या दिग्गजांनी या दरम्यान संगीतबद्ध केलेली गाणी अत्यंत सुरेल आहेत. ती वाजवण्यातली मौज शब्दातीत आहे. वादनातील विशिष्ट तंत्राचा वापर करून मी एकाच वाद्यावर स्त्री, पुरुष व समूहस्वरातील गाणी वाजवते. नाविका रे किंवा हृदयी जागा, तू अनुरागा वगैरे मराठी गीतंही वाजवायला आवडतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.