पुणे

शहरावर केवळ आभाळमाया

CD

पुणे, ता. ८ : शहरात मॉन्सून दाखल होऊन तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, मात्र अजूनही पुणेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसभर ढगाळ हवामानाची ‘आभाळमाया’ कायम आहे. तर तुरळक ठिकाणी दोन ते चार मिलिमीटर पावसाने रस्त्यावर पाणी आले आहे.
शनिवारही शहरात दिवसभरात सरासरी एक मिलिमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मात्र चिंचवड येथे चार मीटर पाऊस पडला. पुढील दोन दिवस शहरात आकाश मुख्यतः ढगाळ आणि बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मोसमात पुण्यात आजवर १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मॉन्सूनचा आस (ट्रफ) सध्या जैसलमेर, कोटा, बालासोर ते पश्चिम बंगालपर्यंत आहे. तसेच राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे राज्यासह दक्षिण भारतात सर्व दूर मॉन्सून सक्रिय राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT