पुणे

परवानगी नसतानाही ‘रूबी’त किडनी शस्त्रक्रिया

CD

पुणे, ता. २१ : मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची परवानगी नसतानाही रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असल्याचा ठपका राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने रूबी हॉल क्लिनिकवर गुरुवारी ठेवला.
मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आल्याचे प्रकरण रूबी हॉल क्लिनिकमध्ये गेल्या वर्षी उघडकीस आले होते. या अंतर्गत रुग्णालयाचा मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा परवाना आरोग्य खात्याने स्थगित केला होता. त्यानंतर काही दिवसांनी तो परत देण्यात आला. मात्र, आरोग्य खात्याच्या तपासणीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा मंजुरी आदेश आढळून आला नाही. त्यानंतरही रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू असल्याची खळबळजनक माहिती आरोग्य खात्याच्या तपासणीत उघड झाली.
राज्यातील धर्मादाय न्यासाच्या रुग्णालयांची नियमित तपासणी सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात येते. त्या अंतर्गत रूबी हॉल क्लिनिकची गुरुवारी तपासणी झाली. या बाबतचा अहवाल खात्याचे सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी तयार केला आहे. त्यात हा ठपका ठेवला असल्याची माहिती पुढे आली आहे.
‘गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र’ (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत रुग्णालयात २६ सोनोग्राफी मशिन आहेत. त्यापैकी फक्त पाच विभागाच्या सोनोग्राफीचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला दर महिन्याला नियमित सादर केला जातो. उर्वरित २१ विभागातील सोनोग्राफी तपासणी अहवालाबद्दल तपास अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केल्याचे सांगण्यात आले.
याबाबत रूबी हॉल क्लिनिकच्या कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे रुग्णालयातील सर्व विभागांची तपासणी करण्यात आली. त्यात रक्तपेढीपासून ते ‘पीसीपीएनडीटी’ आणि पुढे अवयव प्रत्यारोपणापासून ते ‘आयव्हीएफ’पर्यंतच्या प्रत्येक विभागाच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. याबाबतचा अधिकृत अहवाल रुग्णालयाला मिळालेला नाही. मात्र, तो मिळताच त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल. रुग्णालयाचा कारभार कायद्याच्या चौकटीत सुरू आहे. यात कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, असा विश्वास आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT