पुणे

एल थ्री बार पार्टीप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

CD

पुणे, ता. ३ : नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) ‘लिक्विड लीजर लाउंज’ (एल थ्री) बारमधील पार्टीतील अमली पदार्थ सेवनप्रकरणी बार मालक-चालक, पार्टीचे आयोजक, डिजे, अमली पदार्थांचे सेवन करणारे आणि पुरवठा करणारे यांच्यासह अन्य आरोपींच्या पोलिस कोठडीत शनिवारपर्यंत (ता. ६) वाढ करण्यात आली.
आरोपींना बुधवारी (ता. ३) अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जे . एस. भाटिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. बारच्या जागेचा मालक संतोष विठ्ठल कामठे (रा. रंजनीगंध अपार्टमेंट शिवाजीनगर), बार चालविण्यासाठी घेतलेले उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. मुंजाबा वस्ती धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवी माहेश्वरी (रा. उंड्री), पार्टीचे आयोजन केलेला अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डिजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर), मानस पस्कूल मल्लिक (वय ३३, रा. येरवडा), नितीन नथुराम ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव पूर्व), करण राजेंद्र मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) अशी कोठडीत वाढ झालेल्यांची नावे आहेत.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांना महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले कोकेन आणि मेफेड्रोन हे अमली पदार्थ कोठून आले याबाबतचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांना सखोल तपास करायचा आहे. यासाठी पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.
अमली पदार्थांचा पुरवठा केल्याप्रकरणी इडुका स्टेव्हेली संडे (वय ३१, मु. रा. नायजेरिया), अभिषेक अमोल सोनवणे (वय २३, रा. ढोले पाटील रस्ता), ओंकार अशोक सकट (२८, रा. महात्मा फुले पेठ) यांनाही अटक करण्यात आली आहे.
पार्टीत अमली पदार्थांचे सेवन करत असताना व्हायरल झालेल्या चिफत्रितीमधील संगणक अभियंता करण मिश्रा व मुंबईतील आर्किटेक्ट नितीन ठोंबरे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील तपासात पोलिसांना काही धागेदोरे मिळाले त्यानुसार अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT