Tuberculosis sakal
पुणे

Tuberculosis treatment in Pune : दुर्मिळ क्षयरोगावर पुण्यात उपचार

क्षयरोगाचा (टीबी) फुफ्फुसांवर परिणाम होतो, हे बहुतांश जणांना माहिती आहे. मात्र, त्याचा संसर्ग डोळ्यांवरही होतो, ही दुर्मिळ घटना

सकाळ वृत्तसेवा

Tuberculosis treatment in Pune : क्षयरोगाचा (टीबी) फुफ्फुसांवर परिणाम होतो, हे बहुतांश जणांना माहिती आहे. मात्र, त्याचा संसर्ग डोळ्यांवरही होतो, ही दुर्मिळ घटना आहे. डोळ्याचा क्षयरोग झालेल्या येमेनमधील २१ वर्षांच्या मुलीवर पुण्यात यशस्वी उपचार करण्यात आले. त्यातून तिची दृष्टी वाचविण्यातही नेत्रतज्ज्ञांना यश आल्याची माहिती पुढे आली आहे.


येमेनची रहिवासी ही मुलगी तेथील प्रयोगशाळेत तंत्रज्ञ आहे. तिला सतत ताप येत होता. अवघ्या तीन महिन्यांमध्ये १४ किलो वजन कमी झाले. तिचा अशक्तपणा वाढला. यापूर्वी सहजतेने होणारी कामेही तिला होत नव्हती. अखेर ती मुलगी तेथील डॉक्टरांकडे गेली.

तिच्यावर विषाणूंच्या संसर्गावर उपचार केले, पण त्यातून प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर वारंवार तिला रुग्णालयात दाखल करावे लागत होते. मात्र, रोगाचे अचूक निदान होत नव्हते. तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. अखेर त्यांनी उपचारासाठी भारताच्या दिशेने उड्डाण केले.

असे झाले निदान...
ताप आणि वजन कमी होणे, इतकीच लक्षणे रुग्णाला होती. तिला इतर कोणताही त्रास होत नव्हता. त्यामुळे वजन कमी होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विविध तपासण्या करण्यात आल्या. पण, त्याचे सर्व रिपोर्ट अगदी ‘नॉर्मल’ होते.

एखादा आनुवंशिक आजार किंवा स्वतःच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्याही चाचण्या केल्या. त्यातूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही. वजन झपाट्याने कमी होण्यामागच्या दुर्मिळ कारणांमध्ये डोळ्यांचा क्षयरोग हे कारण असते.

रुग्णाची नेत्रतपासणी करताना त्यात काही बदल स्पष्टपणे टिपले. क्षयरोग किंवा आनुवंशिक आजार या दोन्हीपैकी एकामुळे हे बदल डोळ्यात होतात. त्यामुळे सुरवातीला क्षयरोग निदान चाचणी करण्यात आली. त्याचबरोबर रक्त चाचण्याही करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यातून रुग्णाला डोळ्याचा क्षयरोग असल्याचे निदान झाले, असे अपोलो स्पेक्ट्राचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सम्राट शहा यांनी सांगितले.

क्षयरोगाचा दुर्मिळ प्रकार
ऑक्युलर टीबी म्हणजे एम क्षयरोगाच्या (टीबी) संसर्गामुळे डोळ्यांच्या कोणत्याही भागावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. ‘ऑक्युलर टीबी’ फुफ्फुसाच्या ‘टीबी’च्या क्लिनिकल पुराव्याशी संबंधित असू शकत नाही.

‘एक्स्ट्रा-पल्मोनरी टीबी’ (फुफ्फुसांच्या व्यतिरिक्त टीबी)चे लक्षणे असलेल्या ६० टक्के रुग्णांना ‘पल्मोनरी टीबी’चे निदान होत नाही. नेत्र क्षयरोगाचे निदान आव्हानात्मक आहे. सर्वसाधारणपणे, अंधूक दृष्टी आणि प्रकाशाची संवेदनशीलता ही सर्वात सामान्य लक्षणे आहेत.

रुग्णांमध्ये लक्षणे नसणे किंवा डोके दुखणे, चमकणे, डोळा लाल होणे यांसारख्या इतर तक्रारीदेखील असू शकतात. जवळपास एक टक्का रुग्णांमध्ये लक्षणे नसलेला डोळ्यांचा क्षयरोग दिसून येतो.

असे केले उपचार
रुग्णाने औषधोपचार सुरू केला आणि त्याला येमेनला परत पाठवले. रुग्णाला क्षयरोगाच्या औषधांचे दुष्परिणामदेखील समजावून सांगितले. टेलिमेडिसीनसारख्या पर्यायाचा वापर करून आणि उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांशी समन्वय साधून रुग्णावर उपचार करण्यात आले. रुग्णाचे वेळीच लवकर निदान झाल्यामुळे, हा क्षयरोग केवळ डोळ्यांपुरता मर्यादित होता आणि तो इतरत्र पसरला नव्हता.

रुग्ण तीन महिन्यांनंतर भारतात परत आला आणि त्याचे वजन ८ किलोने वाढले होते. रुग्णाला ताप आला नव्हता. त्यामुळे अचानक वजन घटणे याकडे दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे ही छुप्या आजारांचा संकेत असू शकतात. भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. शाह यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT