पुणे, ता. २१ ः पीएमपीएमएल प्रशासन आता नागरिकांसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारत आहे. अदानी टोटल गॅस लि.च्या मदतीने पुण्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. अदानी समूहाच्या पथकाने या जागांची पाहणी केली. पीएमपीच्या जागेवरच हे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. यासाठी अदानी समूह खर्च करणार आहे. जागेच्या बदल्यात पीएमपीला ३२ टक्के रक्कम दिली जाणार आहे.
पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या अनेक ठिकाणी जागा आहेत. त्यापैकी काही निवडक जागांवर ई- वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. हे चार्जिंग स्टेशन सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ई-वाहन चालकांची मोठी सोय होणार आहे. चार्जिंग पॉइंटसह अन्य तांत्रिक माहितीचा अभ्यास तसेच जागेची पाहणी अदानी समूहाच्या पथकाने शुक्रवारी केली आहे.
येथे असणार चार्जिंग स्टेशन
- हिंजवडी, कात्रज, बाणेर-सुस रोड, भोसरी, पुलगेट, डेक्कन जिमखाना, हिंजवडी फेज २
काय सुविधा मिळणार
- ज्यांना घरी वा कार्यालयात ई-वाहनांचे चार्जिंग करणे शक्य नाही, अशासाठी हे स्टेशन महत्त्वाचे ठरेल. - २४ तास सुरु राहिल्याने प्रवाशांना जेव्हा वेळ उपलब्ध असेल तेव्हा वाहनांचे चार्जिंग करणे सोपे जाणार.
पीएमपीच्या जागांवर ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. याचा लाभ सर्वांना घेता येईल. तांत्रिकदृष्ट्या नुकतीच पाहणी झाली. लवकरच या कामाला सुरवात होईल.
- ओमप्रकाश बकोरिया,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.