पुणे

स्मृतिभ्रंश आजाराकडे दुर्लक्ष नको

CD

पुणे, ता. २३ : ‘‘मला समोर असलेल्या व्यक्तीचे नाव लवकर आठवत नाही. एखादी वस्तू हवी असेल तर, ती पटकन मागता येत नाही. हे घरात आणि कार्यालयात सातत्याने घडू लागले. नेमकी काय गडबड झाली ते कळायला तयार नव्हते. अखेर, डॉक्टरांकडे धाव घेतली आणि ही सर्व लक्षणे स्मृतीभ्रंशाची असल्याचे उमगले. त्यानंतर उपचार सुरू झाले. आता सहा महिन्यांनंतर परिस्थिती कायम असली तरीही फारशी बिघडलेली नाही. त्यामुळे गेलेला आत्मविश्वास परत मिळाल्याची सकारात्मकता निर्माण होऊ लागली आहे,’’ असे पांडुरंग बोकील बोलत होते...
स्मृतिभ्रंश (अल्झायमर) आजार मेंदूची गंभीर स्थिती आहे. यामुळे संवाद साधण्यात अडथळे येतात. या रुग्णांचा संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. या पार्श्वभूमिवर बोकील बोलत होते.

स्मृतिभ्रंश म्हणजे काय?
स्मृती आणि मेंदूच्या इतर कार्यावर परिणाम करणारा हा आजार आहे. स्मृतिभ्रंशाची हा वाढत जाणारा रोग आहे. त्याची सुरुवात स्मरणशक्ती कमी होण्यापासून होतो आणि नंतर रुग्णाची संभाषण करण्याची क्षमता संपते. हा आजार विचार, स्मरणशक्ती आणि भाषा यांना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागांशी संबंधित आहे, अशी माहिती खराडी येथील मणिपाल रुग्णालयाचे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. भूषण जोशी यांनी दिली.

कसे होते निदान?
स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या शक्तीशी संबंधित समस्या स्वतः व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबीयांना जाणवतात. त्याच वेळी वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक आहे. त्यातून रुग्णाच्या मेंदूची कार्यक्षम समजते. ‘एमआरआय’ किंवा पेट स्कॅनसारख्या अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानातून केलेल्या चाचण्यांमुळे मेंदूची रचना स्पष्ट दिसते. त्या रचनेत काही बदल किंवा काही भाग आक्रसलेले दिसल्यास स्मृतिभ्रंशाची शक्यता वर्तवली असते. या रोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास, जनुकीय चाचणी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. काही जनुकांमध्ये झालेल्या बदलांमधून स्मृतिभ्रंशाचा धोका कळतो.

जीवनाची गुणवत्ता सुधारते
सुरवातीलाच औषधोपचार सुरू केल्यास रुग्ण अधिक काळ चांगले जीवन जगू शकतो. अशा उपचारांमुळे ते आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतात, परावलंबी होत नाहीत, असेही त्यांनी डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

सुरवातीच्या टप्प्यात प्रभावी उपचार
- पुनर्वसन आणि उपचार पद्धतीमुळे रुग्णाला चांगल्या प्रकारे कार्य सुरु ठेवण्यासाठी मदत होते. रुग्ण त्यांची दैनंदिन कामे अधिक व्यवस्थित करू शकतात.
- मेंदूसाठी निरोगी जीवनशैलीचा नियमित शारीरिक व्यायाम, संतुलित आहार, सामाजिक सहभाग, सकारात्मक विचार यातून आजार वाढण्याचा वेग मंदावतो.
- रुग्णाच्या जवळच्या नातेवाइकांची भूमिका महत्त्वाची असते.

आव्हाने आणि अडथळे
- स्मृतिभ्रंश आजाराची सुरवातीची लक्षणे बऱ्याचदा लोकांना समजतच नाहीत. त्यामुळे निदान होण्यास विलंब होतो.
- रुग्ण आपला आजार पटकन दुसऱ्याला सांगत नाही. त्यामुळे सुरवातीच्या काळात निदान करणे हे आव्हान असते.
- काही भागांमध्ये खास स्मृतिभ्रंश देखभालीसारख्या आरोग्य देखभाल सेवा सहज मिळत नाहीत.
- अल्झायमर रोग कधी कधी इतर कोणत्यातरी रोगासारखा वाटू शकतो, ज्यामुळे योग्य उपचार मिळण्यात विलंब होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

Assembly Election: मतदानासाठी केंद्रावर आले, मतपेटीवरील बटन दाबताच... गावात हळहळ, काय घडलं?

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

Beed Election Voting: बीडमध्ये उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू; अपक्ष उमेदवाराच्या मृत्यूने हळहळ

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा

SCROLL FOR NEXT