पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थच्या प्रवेशांना मुदतवाढ

CD

पुणे, ता. २ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाले अंतर्गत येणाऱ्या प्रवेशांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कला व वाणिज्य विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर पदवी या दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.
दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेशसंख्या यंदा घटली आहे. प्रवेशासाठी दोन महिन्यांची मुदत देऊनही मागील वर्षीच्या तुलनेत दोन हजारांनी प्रवेश घटले आहेत. मागील वर्षी या अभ्यासक्रमांसाठी एकूण ५ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा केवळ ३ हजार २८४ एवढेच प्रवेश झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ दिली. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यावा, या हेतूने ऑनलाइन नावनोंदणी करण्यासाठी मुदत दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज व प्रवेश शुल्क भरण्याची मुदत २० ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे, तर प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह २५ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रेंद्रावर जमा करणे आवश्यक आहे.

मागील दोन महिन्यांत आलेले अर्ज
- बीए ः ५३२
- बीकॉम ः ७५६,
- एमए ः १ हजार ६२
- एमकॉम ः ९३४
एकूण ः ३ हजार ९२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT