पुणे

पुण्यातील पार्थ गायकवाड इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ

CD

पुणे, ता. १३ : विमाननगर येथील रहिवासी असलेल्या पार्थ गायकवाड याची भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये अभियंता वैज्ञानिक या पदासाठी निवड झाली. तिरूअनंतपुरम येथील भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेत बी.टेक.ची पदवी प्राप्त केल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे.
पार्थने कल्याणीनगर येथील बिशप स्कूलमधून दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी पात्रता परीक्षा अर्थात जेईई ॲडव्हान्सद्वारे एरोस्पेस इंजिनिअरिंग विषयात अंतराळ संस्थेत बीटेकची पदवी प्राप्त केली आहे. आता श्रीहरिकोटा येथील सतीष धवन अंतराळ केंद्रात अंतराळ अभियंता पदासाठी पार्थची निवड झाली. पार्थचे वडील सूर्यकांत गायकवाड म्हणाले,‘‘सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काम इस्रो करत आहे. तेथे एखाद्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा वैज्ञानिक पदापर्यंत जाणे, आमच्यासाठी निश्चितच स्वप्नवत गोष्ट होती. पार्थने कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT