पुणे

तुम्ही सप्लिमेंट नाही तर रसायन खाताय

CD

पुणे, ता. ५ : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करताय ना ! हे चांगलेच आहे. पण, त्याचबरोबर काही पूरक आहार (सप्लिमेंटस्) खाताय का? मग, सावधान. कारण तुम्ही पोषकद्रव्ये नाही तर अक्षरशः वेगवेगळी रसायन आपल्या पोटात घेत आहात. त्याच्या फायद्यापेक्षा तुमच्या शरीराला तोटा निश्चित जास्त होतो, असं स्पष्ट मत वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
आपण डॉक्टरांकडे जातो किंवा व्यायाम शाळेत जातो तेव्हा आपल्याला काही ‘सप्लिमेंट’ घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यात वेगवेगळ्या ‘फ्लेवर’च्या प्रथिनांची पावडर असते. यातून तुमचे शरीर सुदृढ राहील, अशा जाहिरातीही केल्या जातात. पण, खरा प्रश्न आहे की, अशा प्रकारची पूरक पोषकद्रव्ये आपल्या शरीरासाठी खरोखरच आवश्यक आहेत का? याबाबत यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपिन विभूते यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पोषकद्रव्यांचा व्यापार
डॉ. विभूते म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या कंपन्या विविध प्रकारची पोषकद्रव्यांचे उत्पादन करतात. त्यांचा हा व्यापार २२ अमेरिकन बिलियन डॉलर्सचा आहे. वेगवेगवेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरसची निरोगी शरीरासाठी आवश्यकता असते. पण, शरीराला कशा प्रकारे पोषकद्रव्ये मिळतात, हे महत्त्वाचे ठरते. ते नैसर्गिक स्रोतांतून मिळत आहेत की, कृत्रिम पद्धतीने आपण शरीरात घेत आहोत, याकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे.’’

सिंथेटिक पोषकद्रव्ये म्हणजे काय?
बाजारात उपलब्ध असलेली ९५ टक्के पोषकद्रव्ये ही सिंथेटिक प्रकारात आहेत. याचा अर्थ नैसर्गिक प्रकारात उपलब्ध असलेली पोषकद्रव्ये वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांच्या माध्यमातून प्रयोगशाळेत तयार केली जातात. त्यामुळे नैसर्गिक आहारातून मिळणाऱ्या पोषकद्रव्यांची तुलना रासायनिक पद्धतीने केलेल्या पोषकद्रव्यांशी होऊ शकत नाही, असेही डॉ. विभूते यांनी सांगितले.

शरीरावर काय परिणाम होतो?
अँस्कॉर्बिक अॅसिडच्या माध्यमातून आपल्याला शरीरात नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन ‘सी’ मिळते. डेस्ट्रो आणि लेव्हो अशा दोन प्रकारांत हे व्हिटॅमिन असते. बहुतांशवेळा आपले शरीर डेस्ट्रो प्रकारात हे व्हिटॅमिन घेते. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या व्हिटॅमिन ‘सी’मध्ये हे प्रकार नसतात. ते ‘सिंथेटिक केमिकल अॅस्कोर्बिक अॅसिड’ असते. त्यात अनेक पेट्रोलियम पदार्थ आणि फ्लेवर्स असतात. त्यामुळे ते शरीरात गेल्यानंतर शरीराच्या दृष्टीने ते आक्रमण ठरते. शरीरात ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. कोणत्याही संत्रिवर्गीय फळांतून मिळणारे सी व्हिटॅमिनशी याची तुलना करता येणार नाही, असेही डॉ. विभूते यांनी नमूद केले.

सेंद्रिय पोषकद्रव्ये
काही जण सेंद्रिय पोषकद्रव्ये (ऑरगॅनिक सप्लिमेंट) आहारात घेत असल्याचे सांगतात. पण, त्यातही प्रिझर्वेशन्स, फ्लेवर आणि रसायनांचा वापर केलेला असतो. त्याशिवाय त्यांची साठवणूक करता येत नाही. आपल्या कायद्यात अशी तरतूद आहे की, १० टक्के घटक सेंद्रिय आणि ९० टक्के सिंथेटिक असले तरीही त्याला सेंद्रिय उत्पादन म्हणून जाहिरात करता येते. त्यातून आता आपण काय खातो, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असा इशारा डॉ. विभूते यांनी दिला.

आपल्या शरीरासाठी निश्चित वेगवेगळ्या प्रकारची पोषकद्रव्ये आवश्यक असतात. पण, ती नैसर्गिक स्रोतांतूनच शरीरात जाणे गरजेचे आहे. तरच ते तुमच्या शरीरासाठी दीर्घकाळ उपयुक्त ठरेल. कोणत्याही गोळ्या सातत्याने घेणे हे शरीरासाठी चांगले नसते.
- डॉ. बिपिन विभूते,
यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ

दुष्परिणाम काय?
- प्रत्येकाचे शरीर वेगळे असल्याने सप्लिमेंटला मिळणारा प्रतिसाद वेगळा असतो
- मूत्रपिंडावर दुष्परिणाम होण्याचा धोका
- पचनसंस्थेच्या समस्या वाढतात
- पोषकद्रव्यांचा समतोल बिघडतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT