पुणे

‘ईसीएचएस’मार्फत लाभार्थ्यांना विशेष सुविधा पेरेंट पॉलिक्लिनिकऐवजी इतर ठिकाणहूनही मिळणार १५ दिवसांपर्यंतची औषधे

CD

पुणे, ता. ११ : माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना विभागाने (ईसीएचएस) लाभार्थ्यांसाठी सेवेत काही सकारात्मक बदल केले आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांना त्यांच्या पेरेंट पॉलिक्लिनिक व्यतिरिक्त इतर दुसऱ्या पॉलिक्लिनिकमधूनही सुमारे १५ दिवसांपर्यंतची औषधे एकाचवेळी घेता येणार आहेत. पूर्वी अशा स्थितीत लाभार्थ्यांना केवळ सात दिवसांचीच औषधे उपलब्ध होत होती. दरम्यान, या निर्णयामुळे लाभार्थ्यांना ‘नॉन-पेरेंट पॉलिक्लिनिक’मधूनही औषधे घेताना अडचणी येणार नाही.

ईसीएचएसद्वारे माजी सैनिक, त्यांच्या अवलंबितांना आरोग्य सेवा देण्यात येत असतात. मात्र निवृत्तीनंतर ज्या भागात माजी सैनिक स्थायी होतात, त्यानुसार ते आपल्या पेरेंट पॉलिक्लिनिकची नोंद करतात. यामुळे वारंवार औषधांसाठी जाण्याऐवजी ते आपल्या पेरेंट पॉलिक्लिनिकमधूनच १५ ते ३० दिवसांची औषधे एकाचवेळी घेऊ शकतात. यासाठी पॉलिक्लिनिकमध्ये तेथील नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी औषधांचा साठा उपलब्ध केला जातो. त्यामुळे नोंदणीकृत पॉलिक्लिनिकऐवजी दुसऱ्या ठिकाणहून औषधे घेताना औषधांचा साठ्याच्या मर्यादेमुळे त्यांना सातपेक्षा जास्त दिवसांसाठी औषधे उपलब्ध होत नव्हती. अशावेळी त्यांना प्रत्येकी सात दिवसांनी पुन्हा औषधे घेण्यासाठी जाण्याचा ताप होत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.

सध्या फार्मसी मॉड्युलमध्ये नुकतेच सॉफ्टवेअर बदल केल्यामुळे पालक नसलेल्या पॉलिक्लिनिकच्या लाभार्थ्यांना सात दिवसांपेक्षा जास्त औषध दिले जाऊ शकत नाही. परिणामी, या नव्या सूचनांबाबतची एसओपी पॉलिक्लिनिकमध्ये उपलब्ध नाही. या निर्बंधांमुळे अनेक लाभार्थ्यांना प्रशासकीय गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

वैद्यकीय कारणांमुळे नियमितपणे सांगली ते पुणे असा प्रवास करावा लागतो. आमचे ईसीएचएसचे पेरेंट पॉलिक्लिनिक सांगलीत असल्याने पुण्यात मुक्कामी राहिल्यावर येथील पॉलिक्लिनिकमधून केवळ सात दिवसांचीच औषधे मिळत होती. कधी-कधी महिनाभरही पुण्यात राहावे लागत असल्याने महिनाभराच्या औषधांची नेहमी अडचण येत असे. मात्र, आता या निर्णयामुळे हा प्रश्‍न मार्गी लागला आहे.
- सुनंदा गायकवाड, ईसीएचएस लाभार्थी

नॉन पॉलिक्लिनिकमध्ये औषध उपलब्ध असेल व पॉलिक्लिनिकवर अवलंबून असलेल्या रुग्णांवर औषधांच्या तुटवड्यासारखी समस्या उद्‍भवणार नसेल, तर तीस दिवसांपर्यंतचीही औषधे दिली जाऊ शकतात. तसेच जर लाभार्थी दुसऱ्या शहरात किंवा जिल्ह्यात जास्त काळ राहणार असतील तर ते आपल्या पॅरेंट पॉलिक्लिनिकचे स्थलांतरण करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी गेल्यावर पॉलिक्लिनिक बदलणे शक्य आहे.
- रवींद्र पाठक, माजी सदस्य, सल्लागार समिती, ईसीएचएस

या बाबी लक्षात ठेवा
- नॉन पेरेंट पॉलिक्लिनिकमध्ये सेवा घेणाऱ्या ईसीएचएस लाभार्थ्यांना तेथील अधिकृत स्थानिक क्लिनिकमधून मात्र औषधे घेता येणार नाहीत
- नॉन पेरेंट पॉलिक्लिनिकमध्ये औषधे उपलब्ध नसल्यास औषध उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र घेणे
- त्यानुसार बाहेरून औषधांची खरेदी करून त्यासाठीच्या खर्चाचा परतावा मिळेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Vidhan Sabha List: शरद पवारांचे 'हे' आहेत तरुण तुर्क शिलेदार, पहिल्यांदाच मिळाली संधी; कोण आहेत? वाचा यादी

Sharad Pawar Candidate List: पवारांनी फिरवली भाकरी; युगेंद्र पवारांच्या नावासह 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुझे क्या पता इसे हिंदी आती है! Rishabh Pant चं ऐकून वॉशिंग्टनने चूक केली,एजाज पटेलने बाऊंड्री हाणली

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अशी चिठ्ठी लिहुन पस्तीस वर्षीय युवकाने संपविले जीवन

Jagan Mohan Reddy: आई अन् बहिणीच्या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची कोर्टात धाव; जगनमोहन रेड्डींचं काय बिनसलं?

SCROLL FOR NEXT