पुणे

पावसामुळे २४० हेक्टरवरील पिके बाधित

CD

पुणे, ता. १० : गेल्या दोन दिवसांत विजेच्या कडकडाटासह पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सुमारे २३०.८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज अंगावर पडून खेड तालुक्यातील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावरील प्राथमिक पंचनामे तयार करण्यात आले असून पाच तालुक्यातील १९ गावे पूर्णता बाधित झाली आहेत.

मागील आठवडाभरापासून राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुणे शहरासह जिल्ह्यातील मावळ, भोर, खेड, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पाचही तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून ७०१ शेतकऱ्यां‍चे २३०.८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमध्ये केळी, आंबा, ज्वारी, कांदा, शेवगा, पेरू, कांद्यासह, ज्वारी, बाजरी, गहू आणि इतर भाजीपाल्याला फटका बसला आहे.

इंदापूर तालुक्यात ९.१ मिमी पावसाची नोंद झाली असून एक गाव पूर्णता बाधित झाले आहे. येथील मोरे मळ्यात नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला. वेल्हा तालुक्यात ४.७ मिमी पाऊस झाला असून येथील पंचनामे सुरू आहेत. तर खेड तालुक्यात १.१ मिमी पाऊस झाला असला, तरी सर्वाधिक १३ गावे बाधित झाले आहेत. हवेली तालुक्यात लोणी काळभोर येथे केरबा वगरे यांच्या घरावर वीज पडून घराच्या भिंतींना तडे केले. तर तालुक्यांच्या विविध ३५ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यात आला आहे. इतर तालुक्यात मंडलनिहाय नुकसानीचे पंचनामे सुरू असून लवकरच याबाबत अहवाल तयार करून राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

तालुकानिहाय बाधित गावे आणि क्षेत्र
तालुका - गावे - क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मावळ - ३ - ०.४०
भोर - १ - १.२०
खेड १३ २२१.८४
इंदापूर १ ०.४०
आंबेगाव १ ७.००
एकूण १९ २३०.८४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT