पुणे

अंशतः ढगाळ वातावरण राहणार कायम

CD

पुणे, ता. १० ः शहरात पावसाची स्थिती निवळत असताना उन्हाचा ताप पुन्हा वाढू लागला आहे. कमाल तापमानात ही वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवत आहे. पुढील दोन दिवसानंतर शहर व परिसरात पुन्हा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. ९) झालेल्या जोरदार पावसानंतर सोमवारी (ता. १०) पुन्हा उन्हाचे दर्शन घडले. मात्र, जिल्ह्यात दुपारनंतर तुरळक भागात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. मगरपट्टा येथे ०.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. शहरात ३७.१ अंश सेल्सिअस कमाल आणि १९.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. दरम्यान पुढील आठवडाभर शहरात अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती वर्तवली असून गुरुवारपासून (ता. १३) पुणे व परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची स्थिती अशीच कायम राहू शकते.

राज्यात मात्र वादळी पावसाची स्थिती पुढील पाच दिवस सुरूच राहण्याचा अंदाज आहे. त्यात तापमानातील चढ-उतार कायम आहे. मंगळवारी (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारी (ता. १०) सोलापूर येथे ३९.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील काहीभागात पाऊस आणि गारा पडल्या. दक्षिण राजस्थान व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून आग्नेय अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अशा पोषक स्थितीमुळे राज्यात पाऊस पडत आहे.

येथे पावसाचा इशारा
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT