पुणे : गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यांच्या तुलनेत यंदा पेट्रोल-डिझेल काहीसे स्वस्त झाले आहे. तर सीएनजी तब्बल २४ रुपये प्रतिकिलो महाग झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अनलॉक सुरू झाल्यानंतर इंधन दरवाढीच्या झटक्यातून अजूनही सर्वसामान्य बाहेर आलेले नाहीत.
२०२२ मध्ये मार्च ते जून दरम्यान इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ झाली होती. मेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वाच्च स्थानी पोचल्या होत्या. त्यानंतर ऑगस्टपर्यंत दर कमी झाले. तेच दर आत्तापर्यंत टिकून आहे. मात्र या दरम्यान सीएनजीच्या किमतीत अनेकदा बदल झाले. सीएनजी ९२ रुपयांवरून आता ८६ रुपये किलो झाले आहे.
कोरोनानंतर देशातील इंधनाच्या किमती दररोज बदलण्याचे धोरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार अनलॉकनंतर अनेक दिवस दररोज दर बदलून त्यात वाढत होत होती. मात्र ऑगस्ट २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत. त्यामुळे या काळात वाहन चालकांना कोणतीही आर्थिक छळ सोसावी लागली नाही. मात्र दर कमी होण्याची आस असलेल्यांची मात्र निराशा झाली.
तारीख - पेट्रोल- पॉवर पेट्रोल- डिझेल - सीएनजी
१ एप्रिल २०२२ - ११६ - १२० - ९८- ६२
१ मे २०२२ - ११९ - १२४- १०२ - ७७
१ जून २०२२ - ११० -११५- ९५ - ८०
१४ जुलै २०२२ - ११० - ११५ - ९५ - ८५
४ ऑगस्ट २०२२ - १०५ - १११- ९२ - ९१
११ एप्रिल - २०२३ - १०५ - १११- ९२ - ८६
गेल्या वर्षभरातील सर्वोच्च दर (प्रतिलिटर)
पेट्रोल- ११९
पॉवर पेट्रोल - १२४
डिझेल - १०२
सीएनजी - ९२ (प्रतिकिलो)
वर्षभरात कमी झालेले दर (प्रतिलिटर रुपयांत)
पेट्रोल- ११
पॉवर पेट्रोल - ८
डिझेल - ६
सीएनजी चालक हैराण
ऑगस्ट २०२२ नंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर राहिल्याने या इंधनाचा वापर करणाऱ्यांचा वाहनावरील खर्च कमी झाला. मात्र या उलट परिस्थिती सीएनजी कार चालकांची आहे. वर्षभरात सीएनजी २४ रुपयांनी महागले आहे. तीन वर्षांपूर्वी ५२ रुपये प्रतिकिलो असलेले सीएनजी आता ८६ रुपयांवर जाऊन पोचला आहे.
ऑगस्ट २०२२ नंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे तेलाच्या किमती बरोबर महागार्इ देखील थांबलेली आहे. ही बाब सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. आणखी काही दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती कमी झाल्याने दर स्थिर आहेत.
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन
आधी भरमसाट किमती वाढविण्यात आल्या. त्यातून सरकारच्या तिजोरीत मोठा पैसा देखील जमा झाला. आता टार्गेट पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यात आले. यापूर्वी केलेल्या दरवाढीच्या तुलनेत किंमत जास्त कमी झालेली नाही. त्यामुळे येत्या काळात आणखी दर कमी करणे गरजेचे आहे.
- अभिजित पाटील, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.