पुणे

मुळशी खुर्दमधील रखडलेल्या पुलासाठी महाराष्ट्र दिनी आंदोलन

CD

पुणे, ता. २२ : मुळशी खुर्द ते वाघवाडी-वडगांव पूल हा मुळशी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अत्यावश्यक आहे. मुळशी जलाशयावरील हा पूल लवकरात लवकर पूर्ण करावा, या मागणीसाठी ‘जलतरण प्रवास’ आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार शरद ढमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातही पुलासाठी कोणतीही तरतूद नाही. या कामाकडे सरकारचे लक्ष परत वेधण्यासाठी सेनापती बापट जलसागर, मुळशी खुर्द येथे १ मे रोजी सकाळी १०:३० वाजता दोन ते तीन किलोमीटरचे अंतर पोहून प्रतीकात्मक निषेध नोंदविणार असल्याचे ढमाले यांनी स्पष्ट केले.
हा पूल उभारण्यात यावा, यासाठी पालकमंत्री, ऊर्जामंत्री, पुनर्वसनमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडले आहे. या पुलामुळे मुळशी धरण भागातील २० ते २५ गावे थेट मुळशी तालुक्याशी जोडण्यास मदत होईल, म्हणून हा पूल झाला पाहिजे, अशी धरणग्रस्तांची मागणी असल्याचे ढमाले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT