पुणे

‘एमपीएससी’कडून आठ हजार पदांसाठी आज परीक्षा

CD

पुणे, ता. ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (ता. ३०) होत आहे. एकूण आठ संवर्गांतील ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’कडून ही पूर्व परीक्षा घेण्यात येत असून, आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पदांसाठीची ही पहिलीच भरती प्रक्रिया आहे.
अराजपत्रित गट-ब आणि गट-क संवर्गातील पदांसाठीच्या या परीक्षेसाठी राज्यभरातील जवळपास चार लाख ६६ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल. गट ‘ब’ सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबरला आणि गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे.

‘या’ विभागांसाठी भरती
- सामान्य प्रशासन विभाग ः सहायक कक्ष अधिकारी ः ७० पदे
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग ः सहायक कक्ष अधिकारी ः ८ पदे

- वित्त विभाग
१) राज्य कर निरीक्षक ः १५९ पदे
२) तांत्रिक सहायक ः १ पद
३) कर सहायक ः ४६८ पदे

- गृह विभाग
१) पोलिस उपनिरीक्षक ः ३७४ पदे,
२) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ः ६ पदे
- महसूल व वन विभाग ः दुय्यम निबंधक (श्रेणी १) किंवा मुद्रांक निरीक्षक ः ४९ पदे
- मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये ः लिपिक टंकलेखक ः ७०३४ पदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT