पुणे

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती अंतरिम निकाल जाहीर

CD

पुणे, ता. २९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर केला आहे. यात इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा पाच लाख १४ हजार १३१ आणि आठवीची परीक्षा तीन लाख ५६ हजार ३२ विद्यार्थ्यांनी दिली.

राज्यात परीक्षा परिषदेने १२ फेब्रुवारी २०२३ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेत इयत्ता पाचवीसाठी पाच लाख ३२ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या परीक्षेसाठी तीन लाख ६७ हजार ७९६ अशा नऊ लाख ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर तीन-चार महिन्यांनंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असे. परंतु यंदा परीक्षा झाल्यानंतर सव्वा दोन महिन्यातच अंतरिम निकाल जाहीर केला आहे.
गुणपडताळणी आणि माहितीत दुरुस्तीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. यावेळी परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीच्या निकालासह शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा यांचा अंतरिम निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर केला. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगइनमधून, तसेच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती दराडे यांनी दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील आकडेवारी....
पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा
तपशील : राज्य : पुणे
नोंद केलेले परीक्षार्थी : ५,३२,८७६ : ५५,१२९
परीक्षा दिलेले विद्यार्थी : ५,१४,१३१ : ५३,०८९
गैरहजर विद्यार्थी : १८,७४५ : २,०४०
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी : १,१३,९३८ (२२.१६टक्के) : १५,७०४ (२९.५८टक्के)

आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा :
तपशील : राज्य : पुणे
नोंद केलेले परीक्षार्थी : ३,६७,८०२ : ३२,३९६
परीक्षा दिलेले विद्यार्थी : ३,५६,०३२ : ३१,२४४
गैरहजर विद्यार्थी : ११,७७० : १,१५२
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी : ५५,५५७ (१५.६०टक्के) : ७,१४० (२२.८५ टक्के)


काय करावे लागणार
- विद्यार्थ्यांच्या गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये ९ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध राहतील
- गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये शुल्क ऑनलाइनद्वारे भरावे लागणार
- गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगइनमध्ये अर्ज आल्यानंतर ३० दिवसांत कळविणार
- विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम आदी दुरुस्तीसाठी ९ मेपर्यंत शाळेच्या लॉगइनमध्ये अर्ज उपलब्ध असेल.


अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :
- www.mscepune.in
- https://www.mscepuppss.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT