पुणे

वृक्षांना आलिंगन देत चिपको आंदोलन झाडे तोडू नका म्हणत पुणेकरांची प्रशासनाला आर्त हाक

CD

पुणे, ता. २९ : नदीकाठ सुधार प्रकल्पांतर्गत नदीकाठची झाडे तोडून पर्यावरणाला धोका निर्माण केला जात असल्याचा आरोप करत शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी संभाजी उद्यान ते नदीकाठचा रस्ता अशी फेरी काढून त्यास विरोध केला. तसेच नदीकाठी असलेल्या झाडांना आलिंगन देऊन चिपको आंदोलनाद्वारे ‘झाडे तोडू नका,’ अशी मागणी केली.

पुणे महापालिकेतर्फे सध्या बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यान नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना नदीकाठची झाडे काढली जाणार आहेत. याविरोधात शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी ही झाडे काढू नयेत, अशी भूमिका घेत गेल्या काही दिवसांपासून विरोध सुरू केला आहे. झाडे तोडू नयेत यासाठी चिपको आंदोलनात पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले होते. त्यानुसार शनिवारी सायंकाळी संभाजी उद्यान ते नदीकाठी गरवारे पुलाच्या खालपर्यंत फेरी काढली. या वेळी ‘आरएफडी हाय हाय,’ ‘नदीकाठ सुधार प्रकल्प रद्द करा,’ ‘वाचवा वाचवा पर्यावरण वाचवा, झाडे वाचवा,’ अशा घोषणा दिल्या. हे नागरिक भिडे पुलापासून नदीपात्रात आल्यानंतर त्यांनी तेथे झाडांना आलिंगन देऊन चिपको आंदोलन केले. तसेच नदीच्या बाजूने मानवी साखळी करून ‘पर्यावरण रक्षणासाठी एकत्र या,’ असे आवाहन या वेळी पुणेकरांना केले.

सभागृहात पाठिंबा, रस्त्यावर विरोध
महापालिकेच्या मुख्यसभेमध्ये नदीकाठ सुधार प्रकल्पाला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा देत मध्यरात्री हा विषय मंजूर केला होता. मात्र, आज या प्रकल्पाविरोधात आंदोलन होत असताना यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे सभागृहात पाठिंबा आणि रस्त्यावर विरोध अशी स्थिती दिसून आली.

दुर्मीळ वृक्ष काढले जाणार नाहीत
समाजमाध्यमांवर नदीपात्रातील ६ हजार झाडे काढली जाणार आहेत, अशी माहिती पसरवली जात आहे. पण या अफवांवर विश्वास ठेवू नये. हे काम करताना ३ हजार १४२ झाडे न काढता त्यांचे जतन केले जाणार आहे. तसेच त्याबदल्यात ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षारोपण केले जाणार आहे. बाधित होणाऱ्या झाडांमध्ये जुन्या व दुर्मीळ झाडांचा समावेश नाही. काढल्या जाणाऱ्या झाडांमध्ये बहुतांश झाडे ही सुबाभूळ, बाभूळ, विलायत चिंच यांची आहेत. हा प्रकल्प भविष्यातील पर्यावरणबदल, पूरस्थिती यांना तोंड देण्यास सक्षम आहे असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT