पुणे

जागतिक वाहतूक कोंडीत पुणे सहाव्या क्रमांकावर ‘टॉम टॉम’ या डच संस्थेचा अहवाल प्रसिद्ध ; बंगलूर शहर दुसऱ्या स्थानावर

CD

पुणे, ता. २ ः जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातील बंगळूर शहर दुसऱ्या तर पुणे शहराचा सहावा क्रमांक लागला आहे. या क्रमवारीमध्ये लंडन प्रथम क्रमांकावर असल्याचा निष्कर्ष एका ‘डच’ संस्थेच्या अहवालातून पुढे आला आहे.

जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम ‘टॉम टॉम’ नावाची डच संस्था करते, सर्व्हेक्षणानंतर संबंधित संस्था त्यांचा अहवाल प्रसिद्ध करते. संस्थेने नुकताच जगभरातील वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या शहरांची नावे, संबंधित शहरामध्ये १० किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणार वेळ आणि त्यामध्ये संबंधित शहराचा कितवा क्रमांक लागतो, हे त्यांच्या अहवालातून मांडले आहे. संबंधित अहवालामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरामध्ये लंडन प्रथम क्रमांकावर तर बंगलूर शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे सहाव्या क्रमांकावर आहे. तसेच मनिला नवव्या स्थानावर, तर दिल्ली १७ व्या स्थानावर असल्याचे नमूद केले आहे.

पुणे शहरात मागील वर्षांपासून एकीकडे वाहनांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला येणाऱ्या मर्यादा, पायाभूत सोई-सुविधांच्या कामांमुळे वाहतुकीत येणाऱ्या अडचणी, पावसाळ्यात पाणी साठण्यामुळे होणारी तारांबळ, अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दरम्यान, मागील वर्षी पावसाळ्यात एका आंतररराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर वाहतूक कोंडीमुळे स्वतःचे खासगी वाहन सोडून रिक्षाने जाण्याची वेळ आली होती. त्याबाबत त्याने ट्‌विटरवर आपला अनुभव मांडला होता. त्यानंतर आता संबंधित संस्थेच्या अहवालातून पुन्हा एकदा पुण्याच्या वाहतूक कोंडीची सद्यःस्थिती दाखविण्यात आली आहे.

क्रमांक शहर प्रति १० किलोमीटर प्रवासासाठी लागणारा वेळ
- लंडन ३६ मिनीटे २० सेकंद
- बंगलूर २९ मिनीटे १० सेकंद
- डबलीन २८ मिनीटे ३० सेकंद
- सॅपोरो २७ मिनीटे ४० सेकंद
- मिलान २७ मिनीटे ३० सेकंद
- पुणे २७ मिनीटे २० सेकंद
- बुशारेस्ट २७ मिनीटे २० सेकंद
- लिमा २७ मिनीटे १० सेकंद
- मनिला २७ मिनीटे

पुणेकरांचा वाहतूक कोंडीमध्ये वेळ वाया जातो, ते कमी व्हायला पाहिजे. त्याकडे राज्यकर्त्यांनी बघितले पाहिजे. पालकमंत्र्यांनीही त्यामध्ये लक्ष दिले पाहिजे. आमच्या सरकारमध्ये आम्ही दर आठवड्याला बैठक घेत होतो. उद्याची ५० वर्ष लक्षात घेऊन उड्डाणपूल, मेट्रो पुलाची कामे झाली पाहिजेत, त्यासाठी बैठका घेतल्या पाहिजेत. यासंदर्भात मी स्वतः नितीन गडकरी यांच्याशी बोलणार आहे.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT