पुणे

जलपर्णीवर ड्रोनद्वारे औषध फवारणी

CD

पुणे, ता. २ ः नदी, तलावात जलपर्णी वाढल्याने परिसरातील नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेला जास्त खोल पाण्यात औषध फवारणीकरता येत नाही. त्यामुळे आता ड्रोनद्वारे जलपर्णीवर औषध फवारणीचा प्रयोग महापालिका करणार आहे. तो यशस्वी झाल्यास त्यापुढे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुळामुठा नदीमध्ये मिळणाऱ्या सांडपाण्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कात्रज, पाषाण यासह इतर तलावांमध्येही परिसरातील सांडपाणी येत असल्याने हे तलाव जलपर्णीने व्यापून जात आहेत. त्यामुळे तेथे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. नदी काठी किंवा तलावाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना पाण्याचा दुर्गंध आणि डासांचा त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या जातात.
नदी व तलावातील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जात असले तरी तलाव व नदी स्वच्छ होत नाही. नदीतील जलपर्णी तर वाहून जाण्याचीच ठेकेदाराकडून वाट पाहिली जाते. जलपर्णी काढली जात नसल्याने ठिकठिकाणी कमी जास्त प्रामाणात जलपर्णी अडकते. आरोग्य विभागाकडून डासांवर प्रतिबंध करण्यासाठी गल्लीबोळात औषध फवारणी केली जाते. पण नदी व तलावांच्या बाजूने औषध टाकले जातात. पण खोल पाण्यात फवारणी करता येत नसल्याने त्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.


नदी व तलावात जेथे खोल पाण्यात औषध टाकता येत नाहीत, अशा ठिकाणी ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जाणार आहे. प्रायोगिकतत्‍वार ही पद्धत वापरली जाणार आहे. यासाठी दोन लाखापर्यंत रुपये खर्च आहे. या पद्धतीमुळे डासांचा प्रतिबंध कमी झाला तर पुढील विचार करण्यात येईल.
- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य प्रमुख, आरोग्य विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT