पुणे : पुणेकरांना मिळकतकराची सवलत पुन्हा लागू केल्यानंतर ही सवलत आपल्याला कशी मिळणार? त्यासाठी काय केले पाहिजे? ज्यांची सवलत काढून घेतली नव्हती अशी नागरिकांनी काय करावे, यासह अनेक शंका नागरिकांच्या मनात आहेत. त्यासंदर्भात मिळकतकर विभागाने स्पष्टीकरण देत शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
एप्रिल २०१९ पूर्वीपासून ज्यांची सवलत आजही कायम आहे. त्यांनी पुन्हा ‘पीटी ३’ अर्ज भरण्याची गरज नाही. मात्र, जीआयएस सर्वेक्षणानंतर व एक एप्रिल २०१९ नंतर ज्यांच्या मिळकतींची नोंद झालेली आहे, अशांना ४० टक्के सवलत नाही. त्यांनी ती पुन्हा मिळावी यासाठी रहिवासी पुरव्यांसह ‘पीटी ३’ अर्ज भरावा, असे मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
याकडे लक्ष द्या
- सवलत केवळ स्वः वापराच्या निवासी मिळकतींना
- भाडेकरू ठेवलेल्यांना सवलत नाही
- जीआयएस सर्वेक्षणातील मिळकतींना ४० टक्के फरकाची देयके
- नवनोंदणी झालेल्या मिळकतधारकांकडून पूर्ण बिल वसूल
- ज्या निवासी मिळकतींना १ एप्रिल २०१८ पासून ते ३१ मार्च २०२३ पर्यंत सवलत दिलेली नाही, अशांना ही सवलत सुरू करण्यासाठी ‘पीटी ३’ अर्ज भरणे बंधनकारक
- अर्ज संपूर्ण पुराव्यांसह १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन खात्याकडे सादर करणे आवश्यक
- संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम ‘पीटी ३’ अर्ज भरून दिल्यानंतर पुढील ४ वर्षांच्या समान हप्त्यातून वळती होईल
- हा अर्ज न भरल्यास मिळकतीचा वापर स्वतःसाठी करत नसल्याचे गृहित धरून ४० टक्क्यांची सवलत दिली जाणार नाही
- ‘पीटी ३’ अर्ज महापालिकेचे संपर्क कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय नागरी सुविधा केंद्र, पेठ निरीक्षक यांचेकडे जमा करता येईल
- १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या निवासी मिळकतींना दिलेली ४० टक्के सवलत कायम. त्यांनी ‘पीटी ३’ अर्ज भरण्याची आवश्यकता नाही
- ‘पीटी ३’ हा अर्ज क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षकांच्या कार्यालयात उपलब्ध होणार
अर्ज सादर करताना आवश्यक पुरावे
- ‘पीटी ३’ अर्जासोबत मिळकतीचा वापर स्वतः राहण्यासाठी करत असल्याचे सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र (सोसायटी असल्यास)
- अर्जासोबत मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, रेशनकार्ड आदी
- शहरात अन्यत्र मिळकत असल्यास त्याच्या मिळकतकराच्या बिलाची प्रत ‘पीटी ३’ अर्जासोबत जोडावी
- अर्ज सादर करताना त्यासोबत २५ रुपये चलन शुल्क जमा करावे
- पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षक यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रकरण अंतिम केला जाईल
येथे मिळेल ‘पीटी ३’ अर्ज
या क्यूआर कोडवर फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.