Sharad pawar esakal
पुणे

BJP News: राष्ट्रवादीमुळेच निवडणुका रखडल्या; भाजपच्या बड्या नेत्याचा अजब दावा

CD

पुणे, ता. १८ : ‘‘महापालिका निवडणुका घेण्यास भाजप-शिवसेना आजही तयार आहे,’’ असे सांगून ‘‘महाविकास आघाडी सरकारने प्रभागरचनेसंदर्भात घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात गेली आहे. म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकांच्या विलंबाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर गुरुवारी फोडले.

भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीसाठी बावनकुळे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी भाजप कार्यसमितीच्या बैठकीतील विषयांपासून ते महाविकास आघाडी सरकारने केलेला गैरकारभार, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील पराभव, आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपासून ते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रदीप कुरुलकर यांची अटक, त्र्यंबकेश्वर येथील वाद यांच्यासह विविध विषयांवर पक्षाची सविस्तर भूमिका मांडली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘किंचित सेनेतील नेतेमंडळी सोडून जातील या भीतीनेच मुंबईत कोणी भाजपचे नेते आले की राऊत टीका करतात.’’ ‘‘मुंबईत महापौर आमचाच होणार,’’ असेही त्यांनी सांगितले. तसेच जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा नड्डा यांचा प्रवास किती महत्त्वाचा होता हे संजय राऊत यांना कळेलच.’’

कुरुलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधाबाबत ते म्हणाले, ‘‘पक्षाने त्यावर भूमिका का मांडावी? त्यांची चौकशी सरकारमार्फत केली जात आहे. कोणत्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्यामुळे संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही. जर त्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. तो कोणत्या धर्माचा आहे किंवा जातीचा आहे, हे बघून भाजप कोणालाही टार्गेट करत नाही.’’ तर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता त्यावर बोलण्यावर काही अर्थ नाही, असे सांगून त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

मुख्यमंत्रिपदाच्या ठरावावर भाष्य नाही
कार्यसमितीच्या बैठकीत केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारी, सिलिंडरमध्ये झालेली दरवाढ कमी करावी, हा ठराव मांडला जाणार का, असा प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले, ‘‘हा प्रश्न आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित आहे. कर्नाटकच्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने अशी अनेक आश्वासने दिली. ती पूर्ण करण्याएवढे बजेट तरी त्यांच्याकडे आहे का,’’ असे कारण देत थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. तर ‘‘भाजपचा मुख्यमंत्री असावा असा ठराव मांडणार का,’’ या ‍प्रश्नावरही त्यांनी भाष्य करणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT