Pune Noise Pollution Sakal
पुणे

Noise Pollution System : आव्वाज कुणाचा? पुण्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी यंत्रणा बसविणार

रस्त्यावरील वाहने, कर्णकर्कश हॉर्न, रस्त्यावरची खोदकामे, सायरन असे वेगवेगळे आवाज एकाच वेळी दररोज आपल्या कानावर सातत्याने आदळत असतात.

सकाळ वृत्तसेवा

रस्त्यावरील वाहने, कर्णकर्कश हॉर्न, रस्त्यावरची खोदकामे, सायरन असे वेगवेगळे आवाज एकाच वेळी दररोज आपल्या कानावर सातत्याने आदळत असतात.

पुणे - रस्त्यावरील वाहने, कर्णकर्कश हॉर्न, रस्त्यावरची खोदकामे, सायरन असे वेगवेगळे आवाज एकाच वेळी दररोज आपल्या कानावर सातत्याने आदळत असतात. पण, आवाजाची ही तीव्रता नेमकी किती आहे, याचे मोजमाप नियमितपणे कधी पुण्यात झाले नव्हते. त्यामुळे आता ध्वनी प्रदूषणाकडे बारकाईने ‘कान’ देणारी यंत्रणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) शहराच्या वेगवेळ्या भागात लवकरच बसवणार असल्याची माहिती पुढे आली.

शहरात गणपती विसर्जन मिरवणूक, दिवाळीतील दिवसांमध्ये फटाक्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण मोजणारी यंत्रणा ‘एमपीसीबी’तर्फे उभी केली जाते. पण, विशिष्ट भागात नियमितपणे होणारे ध्वनी प्रदूषणाची पातळी सातत्याने मोजून त्याचे विश्लेषण करणारी कोणतीही यंत्रणा शहरात आतापर्यंत नव्हती. ती सर्व प्रथम बसविण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

गरज का निर्माण झाली?

शहरातील वेगवेगळ्या भागातून ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींची संख्या वाढली. विशेषतः कोरेगाव पार्क आणि नगर रस्ता येथे रात्रीच्या वेळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींचा त्यात समावेश होता. त्यामुळे नेमकी माहिती संकलित करण्यासाठी आता ध्वनी प्रदूषण नियमितपणे मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली, असे ‘एमपीसीबी’च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी शहरातील दोन ठिकाणी ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. आता शहरातील कोणत्या भागात आणि कोठे ही यंत्रणा बसवायची, या बाबत अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ध्वनी प्रदूषण कशाला म्हणायचे?

मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारा सामान्यपेक्षा जास्त आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. त्यामुळे मानवाच्या दैनंदिन कार्यात थेट अडथळा निर्माण होतो.

वाढती समस्या

औद्योगिकीकरण, वाढते बांधकाम क्षेत्र, वाहनांची वेगाने वाढणारी संख्या, विविध सार्वजनिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यातून ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण शहरात वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंदविले आहे. व्यावसायिक क्षेत्रात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होत असल्याचेही यात अधोरेखित करण्यात आले आहे.

ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम

- बहिरेपणा येतो

- रक्तदाब वाढतो

- मानसिक त्रास

- थकवा येणे

- पाचेंद्रियांची कार्यक्षमता कमी होते

ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण (सर्व आकडे डेसिबलमध्ये)

ठिकाण ........................... दिवसा ............................ रात्री

................................. (सकाळी ६ ते रात्री १०) ....... (रात्री १० ते सकाळी ६)

औद्योगिक क्षेत्र ........................ ७५ .................................. ७०

व्यावसायिक क्षेत्र ..................... ६५ ................................... ५५

निवासी क्षेत्र ............................ ५५ .................................... ४५

शांतता क्षेत्र ............................. ५० ..................................... ४०

ध्वनी प्रदूषणाची माहिती संकलित करण्यासाठी शहरात दोन ठिकाणी लवकरच उपकरणे बसविण्यात येणार आहे. त्यातून मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणातून ध्वनी प्रदूषणाचा मुख्य स्रोत आणि त्याची पातळी समजेल. त्या आधारावर ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे धोरण आखता येईल.

- प्रताप जगताप, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT