पुणे, ता. १८ : बांधकाम प्रकल्पात २० पेक्षा अधिक सदनिका अथवा दुकाने असतील तर त्या प्रकल्पांमध्ये दस्तनोंदणीसाठी ‘ई-रजिस्ट्रेशन’ संगणकप्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध करून दिली आहे. पुणे व पिंपरी -चिंचवड शहरांतील अशा सुमारे ११० प्रकल्पांमध्ये या सुविधेचा वापर करून ऑनलाइन प्रणालीद्वारे दस्तनोंदणी सुरू आहे. त्यामुळे दस्त रजिस्टर कार्यालयावर ताण कमी होण्यास मदत झाली आहे.
नागरिकांना अधिकाधिक ऑनलाइन सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाकडून दिल्या जात आहे. मागील काही वर्षांपासून नोंदणी विभागाने संगणकप्रणालीचा वापर करून अधिकाधिक सुविधा नागरिकांना घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला आहे. २० पेक्षा अधिक सदनिका अथवा दुकाने असतील तर अशा गृहप्रकल्पांमध्ये आता ई-रजिस्टेशन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा फक्त नवीन सदनिकांसाठीच (फर्स्ट सेल) असणार आहे. यामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत नाही. म्हाडा, पीएमआरडीए यांच्याकडून सोडतीद्वारे वाटप केलेल्या सदनिकांच्या दस्तनोंदणीसाठी सुद्धा ई-रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा फायदा होत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून ई रजिस्टेशनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही शहरात मिळून सुमारे ११० प्रकल्पांमध्ये ही सुविधा सुरू आहे. ई-रजिस्ट्रेशन सुविधेची माहिती जास्तीत जास्त विकासकामांपर्यंत पोचवावी, त्याचबरोबर जास्तीत जास्त विकासकामांना या प्रणालीमध्ये सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे.
सदनिकांची दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात २७ दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. मागील काही वर्षांपासून सदनिका खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नविन बांधकाम प्रकल्पांना ई-रजिस्टेशन या सुविधेचा फायदा होत आहे. मुख्यत्वे दस्त नोंदणी कार्यालयात होणारी गर्दी कमी झाली आहे. नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार दस्त नोंदविता येत आहे.
- संतोष हिंगाणे, मुद्रांक जिल्हाधिकारी
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.