पुणे

सिंहगड रस्त्यावरील बसथांब्यांची दुरवस्था

CD

पुणे, ता. ३ ः सिंहगड रस्त्यावरील बसथांब्यांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. थांब्यांच्या छताला गळती, साठलेले पावसाचे पाणी, अस्वच्छता व त्याची दुर्गंधी यासारख्या विविध समस्यांना तोंड देत प्रवासी बसची वाट पाहत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडीपासून राजाराम पुलादरम्यान दोन्ही बाजूंना मिळून आठ बसथांबे आहेत. येथे बैठक व्यवस्था तोकडी आहे. प्रवासी अधिक आणि बाक कमी असल्याने प्रवाशांना उभेच रहावे लागत आहे. गणेश मळा, पु. ल. देशपांडे उद्यान, बिग बाजार, राजाराम पूल येथील बसथांब्यांवर प्रवाशांची विविध समस्यांना तोंड द्यवे लागत आहे. राजाराम पुलाकडून दत्तवाडीकडे येताना पहिल्याच बसथांब्यावर बैठक व्यवस्था आणि छत मोठे आहे; मात्र झाडीझुडपे वाढलेली असल्याने प्रवाशांना सरपटणाऱ्या जीवांचा धोका संभवतो. या मार्गावरील इतर सर्वच बसथांब्यांची बैठक व्यवस्था आणि छड तोकडे असल्याने जोराचा पाऊस झाल्यास प्रवाशांना भिजण्याशिवाय पर्याय उरत नाही.
अपुऱ्या छतामुळे प्रवाशांना छत्रीचा तसेच झाडाचा किंवा लगतच्या दुकानांचा आधार घ्यावा लागत आहे. येथील बऱ्याच बसथांब्यांजवळ पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरते. तसेच कचऱ्याचे ढीगदेखील साचत आहेत, अशी प्रवाशांची भावना आहे.
अनेक बसथांब्यांवर मद्यपी, श्वान आसरा घेत आहेत. जुलै महिन्यापासून या बसथांब्यांची कामे सुरू होतील, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे यंदाचा पावसाळाही बसप्रवाशांना त्याच परिस्थितीत काढावा लागणार हे मात्र नक्की.
विद्यार्थी किशोर पुंड, प्रज्वल मठपती म्हणाले, ‘‘बसथांब्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. छप्पर आणि जागा वाढवायला हवी. आम्हाला अशा थांब्यांचा त्रास होत आहे.’’
ज्येष्ठ नागरिक संजय केतकर म्हणाले, ‘‘बसथांब्याजवळ पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. आसपास कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत नियमित देखभाल होणे गरजेचे आहे.’’

शहरातील ९० टक्के बसथांबे हे काहीच कामाचे नाहीत. प्रवाशांना उन्हात आणि पावसात थांबावे लागते. पावसापासून बचावासाठी इतर ठिकाणी आसरा शोधावा लागतो.
- गिरीधर गद्रे, ज्येष्ठ नागरिक

हे बसथांबे पावसाळ्यात गळत असतात. बसण्यासाठी बाकदेखील अपुरे पडतात. बऱ्याचदा तेथे मद्यपी पडलेले असतात. त्यामुळे महिलांना बाजूला कुठेतरी उभे राहावे लागते. कचरा, दुर्गंधी, अस्वच्छतेमुळे बसतादेखील येत नाही.
- मारिया रेड्डी, रुग्णालय कर्मचारी


बसथांब्यावरील स्वच्छता तातडीने करण्यात येईल. अनेक कामे मुख्य खात्याकडून केली जातात. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देण्यात येतील.
- प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT