पुणे

पाकिस्तानी इंटेलिजन्सच्या हस्तकांना ओटीपी शेअर

CD

पुणे, ता. ६ : पाकिस्तानी इंटेलिजन्सच्या हस्तकांना ओटीपी (वन टाइम पासवर्ड) शेअर केल्याच्या घोटाळ्यात कथित सहभागाबद्दल ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) पुण्यातून एकाला अटक केली आहे.
‘एसटीएफ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित संजय जांबुरे असे त्या संशयिताचे नाव आहे. तो मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आहे. तो पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत कामाला होता. त्याला पुण्याच्या स्थानिक न्यायालयात हजर करून भुवनेश्वरला नेण्यात आले. अभिजित जांबुरे हा गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून सांख्यिकी विषयातील पदवीधर आहे. तो दोन पाकिस्तानी आर्मी इंटेलिजन्स अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. हा प्रकार २०१८ पासून सुरू होता.
अभिजितने प्री-अॅक्टिव्हेटेड सिमकार्डद्वारे तयार केलेले ओटीपी सायबर गुन्हेगारांना विकले गेले होते. तसेच, पाकिस्तानमधील गुप्तचर अधिकाऱ्यांना फेसबुक मेसेंजरद्वारे ओटीपी शेअर केले. तसेच, तो व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानी आणि नायजेरियन नागरिकांच्या संपर्कात असल्याचे ‘एसटीएफ’ने पत्रकात म्हटले आहे. ‘एसटीएफ’ने या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक केली आहे.

एक ते ३० हजार रुपयांना ओटीपी
ओटीपी शेअर घोटाळ्यातील आरोपी एखाद्या व्यक्तीच्या नावावर अॅक्टिव्हेट न झालेले सिमकार्ड घेत असत. त्याद्वारे ओटीपी तयार करून डिजिटल वॉलेटला एक हजार ते ३० हजार रुपयांना विकत होते. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांना हजारो ओटीपी शेअर केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT