पुणे

नवे टर्मिनल सप्टेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत

CD

पुणे, ता. ८ ः पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित जुलै महिन्याच्या अखेरीस संपेल. नव्या टर्मिनलमध्ये ज्या सुविधा देण्यात आल्या आहेत, त्याच्या चाचणीला ऑगस्टपासून सुरवात होईल. ही चाचणी एक महिना चालेल. सप्टेंबरमध्ये मात्र नवीन टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.
पुणे विमानतळावरील सध्याच्या टर्मिनल इमारतीची जागा कमी असल्याचा फटका प्रवाशांना बसतो. गर्दीच्या हंगामात प्रवाशांची होणारी गर्दी, त्याचा सुविधांवर ताण पडतो. त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुणे विमानतळाचा विकास करण्याचे ठरविले. त्यासाठी नवीन टर्मिनल इमारत बांधली जात आहे. याचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्या टर्मिनल इमारतीमध्ये प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्या सुविधा दिल्या जातात, त्याच येथे उपलब्ध असतील. त्याची चाचणी ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल.

तीन पुलांच्या साह्याने टर्मिनल जोडणार
पुणे विमानतळाच्या सध्या प्रचलित असलेल्या टर्मिनलला नव्या टर्मिनलला जोडण्यासाठी तीन स्तरांवर पूल (ब्रिज) बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. तळमजला, पहिल्या मजल्यावर एअर साइड कॉरिडॉर व सेक्युरिटी होल्ड अशा दोन स्तरांवर पूल बांधले जाणार आहेत. अशा प्रकारे तीन पुलांच्या माध्यमातून दोन्ही टर्मिनलला जोडले जात असल्याने प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणे जाणे सोपे होईल. सुमारे ११ मीटर या पुलाची लांबी असेल.

कसे आहे नवे टर्मिनल?
क्षेत्रफळ : सुमारे ६० हजार चौरस फूट
प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी २० लाख
एरोब्रिज : ५
एकूण खर्च : ५२५ कोटी

प्रवाशांना मिळणार या सुविधा
- प्रवाशांच्या गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर
- प्रवाशांच्या बॅग तपासणीसाठी नवीन मशिन उपलब्ध
- प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज यात एक कमर्शियल लाउंजचादेखील समावेश असणार आहे.
- कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर
- लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
- भोजन कक्ष

नव्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्टपासून प्रवासी सुविधांची चाचणी सुरू होईल. सप्टेंबरमध्ये नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची आशा आहे. उद्‍टनाची तारीख अद्याप ठरलेली नाही
- गगन मलिक, सरव्यवस्थापक, पुणे विमानतळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT