पुणे

‘यिन’तर्फे ‘माझी १०० झाडे’ उपक्रम

CD

पुणे, ता १८ : वृक्षारोपण करूया, पर्यावरणाचे रक्षण करूयाचा संदेश देत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात ‘यिन’ व पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे ‘माझी १०० झाडे’ हा उपक्रम राबविण्यात आला.
सहकारनगर येथील तळजाई टेकडी येथे हा उपक्रम झाला. या वेळी शिसव, लिंब, करंज, अर्जुन आदी देशी झाडे लावण्यात आली. प्रत्येकाने आपल्या भागात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करून पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने हातभार लावावा असे आवाहन या वेळेस ‘यिन’च्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी ‘यिन’ पुणे कोअर टीमचे सदस्य नेहा गवळी, श्रीधर खोबे, सचिन थोरात, मृणाल सिरशीकर, सचिन थोरात, आदेश मदने, ऋषिकेश कोळी, केदार कुंभार, तन्मय सासवडे, सुमीत कांबळे आणि महापालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक उद्यान अधीक्षक स्नेहल हरपळे, वृक्ष निरीक्षक धनंजय सोनोने उपस्थित होते.

शहरात सिमेंटचे जंगल वाढत असताना, निसर्ग संवर्धनासाठी युवा पिढीच्या मदतीने वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमातून समाजाला चांगला संदेश मिळाला आहे.
- प्रथमेश आबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

निसर्ग संवर्धनासाठी तरुणाईने पुढाकार घेऊन ‘निसर्ग रक्षक’ म्हणून काम केले पाहिजे. ‘यिन’च्या युवा सदस्यांनी वृक्षारोपण उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक भान जपले, याचे कौतुक आहे.
- अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक, पुणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT