पुणे

शहरात २४ तासांत वीजजोड

CD

पुणे, ता. २६ : पुणे शहरातील ग्राहकांना अवघ्या २४ तर ग्रामीण भागात ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात यावी, असा आदेश महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सर्व कार्यालयांना दिला आहे.
पुणे परिमंडळातील यंत्रणेमधून वीजभाराच्या मागणीसह वीजजोडणी देणे शक्य आहे, अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून खर्चाची रक्कम भरल्यास त्वरित वीजजोड मिळणार आहे.
नवीन वीजजोडण्या देण्याच्या प्रक्रियेला महावितरणने गती दिली आहे. पुणे परिमंडळामध्ये गेल्या एप्रिल ते जूनपर्यंतच्या केवळ तीन महिन्यांत ६० हजार ९७० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर देखील उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व भागात अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून ग्राहकांच्या मागणीनुसार वीजभारासह नवीन वीजजोडणी देणे शक्य असल्यास शहरी भागात २४ तासांत तर ग्रामीण भागात ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणने www.mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असेही पवार यांनी सांगितले.

अशी होते प्रक्रिया
- नवीन वीजजोडणीचा अर्ज दाखल झाल्यानंतर जोडणीच्या ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक व्यवहार्यता तपासली जाते.
- त्यानंतर वीजजोडणीच्या खर्चाचा अंदाज तयार करून संबंधित ग्राहकांना देण्यात येतो.
- अंदाजित खर्चाच्या रकमेचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली जाते.
- सिंगल किंवा तीन फेजच्या नवीन एका वीजजोडणीसाठी २० किलोवॅट किंवा २७ एचपीच्या वीजभारापर्यंतची सर्व प्रक्रिया शाखा कार्यालयांकडून करण्यात येत आहे.
- त्यावरील ५० किलोवॅटपर्यंतच्या वीजजोडणीची प्रक्रिया उपविभाग कार्यालयांकडून केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT