पुणे

मेट्रोचे दोन्ही मार्गांवर २५ ते ३० रुपये तिकीट

CD

पुणे, ता. २६ ः मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे येत्या मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) उद्‍घाटन झाल्यावर जवळपास पीएमपी बसच्या तिकिटाच्या दरातच प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. वनाज ते रूबी हॉल मार्गांसाठी २५ रुपये तर, पिंपरी चिंचवड- शिवाजीनगर न्यायालयापर्यंत ३० रुपये तिकीट असेल. मेट्रोसाठी किमान तिकीट १० रुपये असेल.

गरवारे कॉलेज ते रूबी हॉल क्लिनिक दरम्यान तर पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान आता थेट मेट्रो सेवेला सुरवात होणार आहे. यापूर्वी वनाज ते गरवारे मार्गावर वाहतूक सुरू झाली होती. तिचा विस्तार आता रूबी हॉल क्लिनिकपर्यंत होत आहे. त्यामुळे गरवारे कॉलेज ते रूबी हॉल दरम्यानच्या मार्गासाठी २० रुपये तिकीट असेल. पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी मार्गावर मेट्रो वाहतूक सुरू आहे. आता तिचा विस्तार फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान होणार असून त्यासाठी २५ रुपये तिकीट असेल.

मेट्रो प्रवासासाठी १०, १५, २०, २५ आणि ३० रुपये तिकीट असेल. सध्या कमाल तिकीट मर्यादा ३० रुपये आहे. वनाज ते संभाजी पूल, महापालिका भवन मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असेल तर, पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय मार्गावरही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा महामेट्रो प्रशासनाचा अंदाज आहे.

मेट्रो २५-३० मिनिटांत धावणार
विस्तारित मार्गांवर मेट्रो वनाज ते रूबी हॉल दरम्यानचे अंतर २०-२५ मिनिटांत पार करेल. तर, पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यानचे अंतर २५-३० मिनिटांत पूर्ण होईल. या दोन्ही मार्गांवर मेट्रो प्रत्येक स्थानकावर किमान एक मिनीट थांबेल. प्रवाशांच्या गर्दीनुसार थांब्यावरील मेट्रोचा कालावधी कमी-जास्त होऊ शकेल, असेही सोनवणे यांनी सांगितले.

मेट्रोचे तिकीट दर पीएमपीच्या तिकिटाच्या जवळपासच आहेत. त्यामुळे १०, २५, ३० रुपयांत प्रवाशांना वातानुकूलित मेट्रोतून प्रवास करता येईल. तसेच, प्रवासाचा वेळही वाचणार आहे. मेट्रोच्या तिकीट दरांची संगणकीकृत यंत्रणेत रचना करण्यात येत आहे.
- हेमंत सोनवणे
संचालक, महामेट्रो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT