पुणे

मध्यवर्ती भागातील शाळांना आज सुटी

CD

पुणे, ता. ३१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरातील विविध कार्यक्रमांना मंगळवारी (ता. १) उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाहतुकीत बदल केला आहे. तसेच, काही रस्ते बंद केल्यामुळे मध्यवर्ती भागासह कॅम्प, डेक्कन, शिवाजीनगर परिसरातील अनेक शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर केली आहे.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक रस्ता, सदाशिव पेठ आणि संबंधित आवारातील सर्व शाळा, महाविद्यालयांना पोलिसांच्या सूचनेनुसार आणि सुरक्षिततेमुळे मंगळवारी सुटी जाहीर केल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांनी दिली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘संस्थेच्या मध्यवर्ती भागातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली आहे. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मंगळवारी शाळेत हजर रहायचे नसले, तरीही त्यांचे वर्ग ऑनलाइन भरणार आहेत.’’ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मध्यवर्ती भागातील शाळांसह सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता यांसह डेक्कन, शिवाजीनगर परिसरातील शाळांना सुटी जाहीर केली आहे.
काही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी मंगळवारी ऑनलाइन वर्ग भरविण्याचे नियोजन केले असून त्याप्रमाणे पालकांना सूचना दिल्या आहेत. काही पूर्व प्राथमिक शाळांना सोमवारी सुरक्षिततेचे कारण सांगत अचानकपणे सुटी दिल्याचे निरोप पालकांपर्यंत पोचविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

Diwali 2024: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी अन् भगवान गणेशाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या? वाचा सविस्तर

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

SCROLL FOR NEXT