पुणे

‘अखिल ब्राह्मण’ संस्थेच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

CD

पुणे, ता. ३१ : ‘‘विद्यार्थ्यांच्या ऊर्जेचे चांगल्या गोष्टींत रूपांतर करण्याचे काम शिक्षक करतात. कृत्रिम बुद्धीमत्ता आली तरीही शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही. शिकवताना शिक्षकांमध्ये असणारी तळमळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून येणार नाही,’’ असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने शिक्षक पुरस्कार आणि विद्यार्थी आर्थिक साहाय्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव, मध्यवर्ती सदस्य अनिल शिदोरे, संयोगिता पागे, शैक्षणिक प्रमुख राजेंद्र देवधर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात भाग्यश्री हर्षे, यशवंत हरिभक्त, लीना भुस्कुटे, हेमंत पाठक या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संस्कृत आणि मराठी विषयात पीएच.डी., पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मकरंद माणकीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमोद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT