पुणे

लंडनमध्ये प्रथमच ‘साडी वॉकथॉन’

CD

पुणे, ता. ३१ : लंडनमध्ये प्रथमच ‘साडी वॉकथॉन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त ६ ऑगस्टला होणाऱ्या या उपक्रमात राज्यातील ५० आणि देशभरातील ५०० महिला सहभागी होणार आहेत.
‘ब्रिटिश वुमन इन सारी’ या संस्थेतर्फे डॉ. दीप्ती जैन यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन केले आहे. परदेशात वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये भारतीय हातमाग आणि हस्तनिर्मित दागिन्यांप्रती जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशातील विविध राज्यांमधील महिला पारंपरिक वेशभूषेत लंडन येथील ऐतिहासिक व प्रतिष्ठित स्थळांवरून यात मार्गक्रमण करणार आहेत. ही वॉकथॉन ट्रॅफल्गार स्क्वेअरपासून सुरू होऊन लंडनच्या वेस्टमिन्स्टरमधील ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वेअर येथे समाप्त होईल.
मूळच्या पुण्याच्या असलेल्या अनुजा जाधव आणि मुंबईच्या रमा कर्मोकर या वॉकथॉनमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्यासह सहभागी होणाऱ्या राज्यातील सुमारे ५० महिला आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटवून देणारे पारंपरिक अलंकार, नऊवारी साडी आणि फेटा परिधान करून यात सहभागी होणार आहेत. ‘पार्लमेंट स्क्वेअर’मध्ये असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लावणी नृत्य सादर करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT