Nitin Gadkari  sakal
पुणे

Pune News : पुणे परिसरात ६० हजार कोटींचे रस्ते - नितीन गडकरी

नितीन गडकरी : पायाभूत सुविधांच्या निर्मितीची गरज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाहन निर्मिती क्षेत्रात येत्या पाच वर्षांत भारत पहिल्या क्रमांकाचा देश असेल. त्यामध्ये देशाच्या विकासाचे केंद्र पुणे असेल. त्यामुळे येथे पाणी, विजेची २४ तास उपलब्धता आणि पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे.

पुण्याला जोडणाऱ्या सर्व महामार्गांचे सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असून, ५० ते ६० हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, ‘‘गेल्या नऊ वर्षांतील विकासामुळे भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. मी मंत्री झालो, तेव्हा आपण वाहन उद्योगात जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर होतो. आता चीन, अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. आगामी पाच वर्षांत आपण या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असू, यामध्ये पुण्याची भूमिका महत्त्वाची असेल. येथे रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल.’’

ही आहेत प्रस्तावित कामे
- पुणे-सातारा रस्त्यावर दोन हजार २३५ कोटी रुपयांचा डबल डेकर पूल
- पुणे, सोलापूर, हडपसर ते यवत दरम्यान रस्त्यावर पाच हजार कोटी रुपयांचा उन्नत (एलिव्हेटेड) महामार्ग
- नगर रस्त्यावर पुणे-शिरूर हा ५६ किलोमीटर आणि ११ हजार कोटी रुपयांच्या कॉरिडॉरच्या डीपीआरचे काम सुरू
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५४ किलोमीटर रस्त्यासाठी साडेसात हजार कोटी आणि नाशिक फाटा ते खेड महामार्गाचा नऊ हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार
- पुणे-बंगळूर ग्रीन फिल्ड महामार्ग आणि पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाच्या डीपीआरचे काम सुरू
- पुणे विभागात पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता

पुण्यातील गर्दी, प्रदूषणाबाबत चिंता
‘‘आता पुण्यात गर्दी वाढवू नका. रस्त्यांच्या वाढीची क्षमता संपली असून, पेट्रोल-डिझेलवरील वाहनांमुळे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पुण्याला आता हवेमधून चालणाऱ्या बसची (डबल डेकर स्काय बस) आवश्यकता आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे सादरीकरण बघून अभ्यास करावा.

शहरातून पेट्रोल-डिझेल हद्दपार केल्यास ४० टक्के प्रदूषण कमी होईल. यासाठी राज्य सरकारने पुण्यात इथेनॉल व इलेक्ट्रिक रिक्षांनाच नवीन परवाना देण्याचा निर्णय घ्यावा. कचऱ्यापासून वीज निर्मिती न करता ग्रीन हायड्रोजन तयार करा. नागपूर येथे रिंगरोडवर केबलचा वापर करून इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहे, याचाही विचार पुण्याने करावा. शहरात निर्माण होणारा कचरा महामार्गाच्या कामात वापरण्यासाठी द्या, त्यातून पुणे कचरामुक्त होईल. माझे पुण्यावर प्रेम आहे, त्यामुळे या शहराला सर्व प्रकारच्या प्रदूषणातून मुक्त करा, असे आवाहन गडकरी यांनी केले.

चांदणी चौकात नवीन तंत्रज्ञान
चांदणी चौकातील कामाचे वैशिष्ट्य म्हणजे देशात प्रथमच ग्रेव्हीलॉक्ड रिटेनिंग वॉल पद्धतीचे तंत्रज्ञान वापरले आहे. यासह मलेशियामधून आणलेल्या नविन तंत्रज्ञानाचाही वापर केल्याने नागरिकांना त्रास झाला नाही, असे गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले....
- पुण्यापेक्षा बंगळूरमधील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर
- बंगळूर येथे भूमिगत ५० किलोमीटरचा आठ लेनचा रस्ता तयार करण्याचे सुचविले
- पंतप्रधानांनी दोन वर्षांपूर्वी पुण्यात तीन इथेनॉल पंपांचे उद्‍घाटन केले; पण एकही थेंब इथेनॉलचा वापर नाही
- नागपूर येथे मैलापाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीतून ३०० कोटी रुपये मिळतात
- याच पद्धतीने पुण्यातील दूषित पाणी शुद्ध करून उद्योग, रेल्वे, शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे
- आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या पालखी मार्गाप्रमाणे देशातील तीर्थक्षेत्र महामार्गाने जोडल्याचा आनंद
- पुढीलवर्षी एप्रिल महिन्यात मानस सरोवराला जाण्यासाठी चीन किंवा नेपाळमार्गे न जाता उत्तराखंडमधून जाता येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT